अपयश यशाची पहिली पायरी
बाळ मग कुणाचही असू दे,स्वावलंबनासाठी किती बरे धडपडतं.माणसाच्या बाळाचच बघाना.
वस्तू हाताता धरणे,रांगणे,बोलणे,
चालणे,खाणे,लिहिणे
अबब कराल यादी तर ती हनुमंताच्या शेपटीसारखी वाढतच राहणार.
प्रयत्ने रगडीता…….
ह्या म्हणी तेच तर सांगतात.
एका दिवसात कुणीही यशोशिखरावर पोहचू शकतच नाही.त्यासाठी हाता तोंडाशी घास येतो,आणि अपयश आल्याने तो घास मुखी पोहचतच नाही ना.
शास्त्र म्हणाल तर ह्याचं एक लाक्षणिक उदाहरण म्हणता येईल,नाही का?
अविरत संशोधन,अपयश,संशोधन,अपयश………
अशी ही शृंखला अविरत सुरूच आहे.रोज नवनविन शोध लागतच आहेत.
वैज्ञानिक चमत्कार हे अपयशाच्या राखेतून उडालेले फिनिक्स पक्षी.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे आमचे स्वातंत्र्य सैनिक,अपयशातूनच यशाकडे कुच करताना दिसतात.ब्रिटिशांशी लढता लढता आलेल्या अपयशाची ढाल करूनच ते सदैव झुंजत राहिले.भारत मातेला हरवलेलं स्वातंत्र्य परत मिळवून देतांना अपयशालाच यशाची पहिली पायरी मानण्यात आलं.
तेव्हा एकच सांगायचय
अपयशानं खचू नका.त्या पायरीवर खंबीरपणे उभे रहा.
यशोमाला निश्चितच गळ्यात पडणार.
— सौ. माणिक (रुबी)
Leave a Reply