नवीन लेखन...

आपलीच चूक

एकदा कुठले तरी आरोग्य मंत्री येणार होते म्हणून शासनाने पत्रक पाठवले होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने. आणि या साठी पारंपारिक व्यायाम प्रकार वैयक्तिक व सामुदायिक याचा कार्यक्रम आयोजित करावा असे परिपत्रक शाळेत आले. त्याचा विचार करत होते की काय करता येईल की ज्याने शाळेचे व आपल्या जिल्ह्याचे नाव झळकेल. आणि सगळ्यात आपले आगळेवेगळे काही तरी करण्याची धडपड होती माझी. मी शाळेतील काही शिक्षिका यांची बैठक घेऊन चर्चा केली. आणि मीच सुचवले होते की आपण मंगळागौरी साठी जागरण करतो तेव्हा जी गाणी व जे खेळाचे प्रकार करतो तो एक पारंपरिक व्यायामच आहे पण ती गाणी आणि प्रकार सादर केले तर चालेल. ते शिकवणे गरजेचे होते मुलींना. त्या वेळी मोबाईल वगैरे नव्हते पण एका सिनेमात पाहिले होते ते कुणाला येतात याची चौकशी सुरू केली. देवाची कृपा झाली आणि एक दोघी तयार झाल्या. पैकी फुगडीचे प्रकार. झिम्मा. पिंगा. घागरी फुंकणे. सूप. कोंबडा. असे बरेच निवडून गाणी पाठ केली. मुलींना बरोबर घेऊन रोज सराव. काही गाणी मनाने रचली होती. कार्यक्रमाच्या अनुशंगाने. मोठ्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर जनसंख्या येणार हे माहित होते म्हणून प्रत्येक प्रकारात खूप मुलींचा सहभाग ठेवला होता. आणि तयारी करण्यात मुख्य अडचण होती ती म्हणजे नऊ वारी साड्या मिळविणे. बऱ्याच मुलीकडे नव्हत्या म्हणून. माझ्या ओळखीच्या एका बाईकडून मी एक आणून वेळ भागवली. सगळा कार्यक्रम एकदम मस्त झाला होता. मंत्री महोदय खूप खुश झाले आणि शाळेची किर्ती वाढविली गेली याचा आनंद आम्हा सर्वांना झाला होता. मुख्य म्हणजे आत्ता पर्यंत असे कुणीच केले नव्हते म्हणून कौतुकाचा वर्षांव झाला….
दुसर्या दिवशी त्या मुलींनी साडीला इस्री करून पिशवी माझ्या कडे दिली होती. प्रार्थनेची वेळ झाला म्हणून मी तिला ऑफिस मध्ये टेबलावर ठेवायला सांगितले होते. वर्ग सुरू झाले रोजच्या प्रमाणे सर्व वर्गावर फिरुन ऑफिस मध्ये आले. पण टेबलावर साडी नव्हती. आणि कपाटाची किल्ली माझ्या जवळ. अशा वेळी कुणाला विचारणार. पालक. शिक्षक. विद्यार्थी. व सेवक यांचे येणे जाणे असते. त्यामुळे मी कुणालाही विचारले नाही. कारण चूक माझी होती. मी जवळ ठेवायला हवी होती. किंवा सेविकेला द्यायला हवी होती म्हणून. शाळा सुटल्यावर मी त्या बाई कडे गेले आणि सगळे सांगितले व म्हणाले की मी तुम्हाला तशीच साडी आणून देते थोडा वेळ लागेल. तश्या त्या रडायला लागल्या. म्हणाल्या की माझ्या माहेरच्या कडून आली होती साडी. आणि नवरा वारल्यानंतर त्यांनी ती साडी जपून ठेवली होती. काठापदराची होती म्हणून. आणि नतंर म्हणाल्या असो माझ्या नशिबात नव्हती ती साडी. पण माझी फार दिवसापासूनची एक इच्छा होती ती म्हणजे आमच्या गावी दरवर्षी रामनवमीला उत्सव होतो तिथे खिरीसाठी एक मोठे पातेले द्यावे म्हणून. पण जमले नाही परिस्थिती मुळे तुम्हाला सांगते त्या मापाचे पातेले दिलात तर माझी इच्छा पूर्ण होईल व तुम्हालाही पुण्य मिळेल. आणि कबूल केल्याप्रमाणे मी तेवढे मोठे जाड बुडाचे पातेले आणि त्यावर त्या बाईंचे पूर्ण नाव टाकून त्यांना दिले. ते पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले व आता किंमती वाढल्या आहेत म्हणून ज्यादाचे पैसे किती झाले ते सांगा मी देते असे म्हणाल्या. यावेळी मी म्हणाले होते की मलाही पुण्य मिळेल असे म्हणाला होतात ना मग एवढे तरी करू दे मला…
आपली वस्तू. पैसे. किंवा काहीही हरवले तेव्हा यात चूक कोणाची याचा विचार करून चौकशी केली तर कुणाचेही मन दुखावले जाणार नाही. आणि संबंध बिघडणार नाहीत. आपल्या निष्काळजी पणा मुळे असे प्रसंग येतात आणि मन कायमस्वरूपी दुरावली जातात हे सगळे मला माझ्या एका चुकीने शिकवले आहे…
— सौ कुमुद ढवळेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..