पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदी ११ हजार कोटींचा चुना लावून गेल्याची बातमी ताजी असतानाच रोटोमॅक पेन कंपनीचा मालक विक्रम कोठारी याने पाच बँकांना पाचशे कोटींचा चुना लावून पलायन केल्याची बातमी समोर आली आहे. नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेस ११ हजार कोटींचा चुना लावला. चुना लावून हे महाशय सहकुटुंब पळून गेले. नीरव मोदी याने जानेवारीतच देश सोडल्याचे उघड झाले, पण गेल्याच आठवड्य़ात हे महाशय पंतप्रधान मोदींबरोबर ‘दावोस’ येथे मिरवत होते. पान परागचे मालक एम. एम. कोठारी यांचा मुलगा विक्रम कोठारी याने पाच सरकारी बँकांमधून ५०० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आणि तो पळाला आहे.रोटोमॅक कंपनी कानपूरमध्ये आहे, त्याचा मालक विक्रम कोठारीने अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक या बँकांना ५०० कोटींचा चुना लावल्याचे उघड झाले आहे.
कर्जाचे हप्ते फेडता येत नाहीत म्हणून या देशातील सामान्य माणूस ,शेतकरी ,कामगार टाचा घासत जगतो किंवा आत्महत्या करतो आहे.देशाच्या एकंदर मानसिकतेत भयंकर बदल होत आहे.एकीकडे देश सन्मानाने कसा पुढे जात आहे याचे दाखले social media वर येत असतानाच देशाचे भयानक वास्तव सुद्धा पुढे येत आहे.दोन्ही बाजूने लोक बोलत आहेत.खरे काय आणि खोटे काय याचे भान कुणालाच उरले नाही .भुजबळ जेल मध्ये आहेत .त्यांचे समर्थक रस्त्यावर त्यांच्या सुटके साठी आंदोलन करीत आहेत.पाटण्यात लालू प्रसाद यादव जेल मध्ये आहेत .त्यांचे समर्थक सर्व पक्षीय मोट बांधून भाजपा ला संपवण्याची भाषा करीत आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पोलिसांचे गृह खाते आपल्या हातात ठेवून कारभार करीत आहेत पण नागपूर ला त्यांच्या घरा शेजारी हुक्का पार्लर जोरात चालत आहे.
सामान्य माणूस विना तक्रार आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी जोडण्यासाठी लायनीत उभा आहे .बँका मात्र धन दांडग्यांना कर्ज देताना सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत.
सर्व सामान्य लोक अर्थ संकल्पात काहीतरी सूट मिळेल या साठी दूरदर्शन च्या बातम्या मोठ्या आशेने पाहत आहेत .आता ” हे सरकार ” तरी देशाचे भले करेल याची अपेक्षा बाळगत एक एक दिवस ढकलत आहे.
रस्त्यावर गर्दी ,ट्रेन मध्ये गर्दी ,रिक्षाच्या लायनीत गर्दी अशी गर्दी अंगावर घेऊन किती दिवस सामान्य माणूस जगणार ? नोकरी साठी तरुण वणवण फिरत आहेत.ज्यांना नोकरी आहे ते कामाच्या वेळेत मोबाईल वर गेम खेळत आहेत.
अराजक अराजक ते वेगळे काय असते? आणि या सर्व गोष्टी बदलण्यासाठी पर्याय कोणता शोधणार ? “त्यांच्या” बजबज पुरीला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून” तुम्हाला” सत्ता दिली ना ? आता लोकांनी अजून किती वर्षे वाट पाहायची ?
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply