अर्देशीर इराणी याचे पूर्ण नाव खान बहादूर अर्देशीर इराणी. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १८८६ रोजी झाला. अर्देशीर इराणी यांनी भागीदारीत १९१४ मध्ये लोहारचाळ येथे अलेक्झांड्रा थिएटर घेतले. अर्देशीर इराणी यांच्याकडे ‘युनिव्हर्सल पिक्चर्स कॉर्पोरेशन’ या विदेशी सिनेवितरण कंपनीची एजन्सी होती. तेथे ते विदेशी चित्रपट प्रदर्शित करत. तेथे लागणारे बहुतेक इंग्रजी चित्रपट हे हाणामारीने भरलेले देमारपट, युध्यपट, स्टंट किंवा कामुक हावभावाचे असत. शेजारीच कामाठीपुरा, उत्तरेस नागपाडा तर दक्षिणेस पिला हाऊस… असा परिसर त्या चित्रपटांसाठी योग्यच! इंग्रजी चित्रपट फोर्टमधील थिएटरमध्येही प्रदर्शित होत, परंतु ‘अलेक्झांड्रा’ने त्यांचे एक वेगळे अस्तित्व जपून ठेवले होते. ते म्हणजे इंग्रजी सिनेमाचे उत्तेजित करणारे पोस्टर.
मुंबईची चित्रपटसृष्टी त्या काळी कोल्हापूर, पुणे व नासिकपेक्षा वेगळी होती. बहुतेक भांडवलदार गुजराती, पारशी होते. पौराणिक चित्रपटाबरोबरच देमार (स्टंट) चित्रपट, जादुईपट अथवा कौटुंबिक चित्रपट तयार केले जात. मुंबईतील मूकपटांची प्रेरणा व्यावसायिकच होती. महाराष्ट्र फिल्म कंपनी किंवा प्रभात फिल्म कंपनी यांच्यासारखा ध्येयवाद किंवा आदर्शवाद मुंबईतील संस्थात नव्हता. अर्देशीर इराणी यांची इंपीरिअल, व इतर चित्रपटसंस्था धंदा करण्याच्या हेतूने स्थापन झाल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून चित्रपटसृष्टी वाढीला लागली. त्याकाळी देमार चित्रपटांची पौराणिक चित्रपटांप्रमाणे चलती सुरू झाली.
शारदा फिल्म कंपनीसाठी भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या १९२५ सालच्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील अभिनेता मा. विठ्ठल पुढे देमार चित्रपटांचा नायक झाला. त्याने अफाट लोकप्रियता संपादन केली. हाच मा.अर्देशीर इराणी १९३१ साली ‘आलम आरा’ काढून पासून हिंदी बोलपटाचा प्रवास सुरू झाला. विठ्ठल हे आलमआरा या पहिल्या भारतीय बोलपटाचे नायक होते. ‘आलम आरा’ हा पहिला बोलपट व ‘दे दे खुदा के नाम पर’ हे भारतीय चित्रपटातील पहिले गाणे मानले जाते. हे गाणे आणि एकूणच या चित्रपटाचे संगीत प्रचंड लोकप्रिय ठरले. त्या वेळी पाश्र्वगायनाचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. त्यामुळे कलाकार स्वत:च गाणी गायचे.
गाण्यांचे तबला, हार्मोनियमच्या साथीने ‘लाइव्ह’ रेकॉर्डिग केले जायचे. महत्त्वाचे म्हणजे हिंदी सिनेमा आणि गाणी हे समीकरण अगदी पहिल्या सिनेमापासून जुळले. गाणी आणि संगीत हे भारतीय चित्रपटांचे आणि त्यातही हिंदी चित्रपटांचा अविभाज्य अंग बनले. युरोपप्रमाणेच भारतातही चित्रपट निर्माण करण्यासाठी स्टुडिओ निर्माण झाले. इम्पिरियल मुव्हिटोन, बॉम्बे टॉकीज, प्रभात फिल्म कंपनी हे सगळे स्टुडिओ होते. कंपनीत ज्याप्रमाणे कर्मचारी असायचे त्याचप्रमाणे फिल्म स्टुडिओमध्येही कलावंत, तंत्रज्ञ सगळेजण पगारी नोकर असायचे. अर्देशीर इराणी यांचे १४ आक्टोबर १९६९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply