नवीन लेखन...

‘अर्धसत्य’ – व्यवस्थेची वैश्विक थुंकी !

अनंत वेलणकर आणि ज्योत्स्ना गोखले अशी मराठी नावं, तीही एखाद्या हिंदी सिनेमातील हिरो – हिरॉईनची, सोबतीला गुप्ते, पाटील असे पोलीस अधिकारी (मुंबईतला सिनेमा म्हणून ), माधुरी पुरंदरे आणि सदाशिव अमरापुरकर अशी दिग्गज मंडळी आणि या सर्वांना एकत्र आणणारी मराठमोळ्या विजय तेंडुलकरांची दाहक लेखणी !

आज यातील ओम पुरी, अमरीश पुरी, शफी इनामदार, सदाशिव अमरापूरकर, स्मिता पाटील, दस्तुरखुद्द तेंडुलकर सारे सारे काळाने आपल्या पडद्याआड नेले आहेत पण “अर्धसत्य ” काही विसरता येत नाही.

वाईचे शीतल घाटही त्याने निर्माण केलेली उष्णता थंडावू शकत नाही.

“व्यवस्था ” हे मानवाचे अपत्य पण मानव आणि व्यवस्था यातील लढा सनातन आहे. व्यवस्था कायम तिच्या निर्मात्याला हतबल आणि “अर्धसत्य “मध्यें तर पौरुषहीन बनवायला बघते. अनंत ते नाकारतो. लहानपणापासून वडिलांची पुरुषसत्ताक व्यवस्था घरात आईला सतत कशी चिरडत असते हे भोगलेला अनंत नोकरीतही तेच पदोपदी अनुभवतो. ज्या रामाशेट्टीला अटक करायची , त्याच्या मिरवणुकीत कायदा आणि सुव्यवस्था (?) राखायची आणि सरतेशेवटी त्याच्या पायावर लोटांगण घालायचे.

मग सगळा राग चौकीतील गुन्हेगारांवर(?) काढायचा किंवा तो दारूच्या मदतीने विसरायचा.

किती सोप्पी उत्तरे?

एक लोबो नामक निलंबित पोलीस अधिकारी, महाविद्यालयाच्या स्टाफरूम मध्ये ऍकॅडेमिक चर्चा करणारे बूर्ज्वा, कालौघात मागे पडलेला पण त्याकाळातील ज्वलंत गिरणी कामगार संप आणि पुढारी, पदकासाठी श्रेयाची लढाई एवढा सगळा अवकाश कवेत घेणारा हा चित्रपट !

ओम पुरी आणि सदाशिव अमरापुरकर हे दोन हिरे चित्रसृष्टीला “अर्धसत्य” ने दिले.

नातं संपलं असलं तरीही ओमला मनातलं बोलण्याचं स्थान पुरविणारी स्मिता -तटस्थ , प्रयत्नपूर्वक या माणसाला समजून घेण्याचे प्रयत्न करणारी !
ती त्याला एक “तेंडुलकरी ” तत्वज्ञान सुनावते- ” जिंदगी बडी उलझी हुई हैं , इसके आसान निर्णय नहीं लिए जाते I ”

अट्टाहासाने “अंकुर “, ” निशान्त “, ” मंथन” आणि “भूमिका” मला दाखवून माझ्या जाणीवा समृद्ध करणारे माझे वडील “अर्धसत्य” बाबत तितकेच आग्रही होते. “कायदा आणि सुव्यवस्था ” याविषयावर भविष्यकाळात मी एम. पी. एस. सी. साठी काही लेखन करेन हे त्यावेळी आम्हा दोघांनाही माहित नव्हते.

” अर्धसत्य” ने त्याकाळी उभे केलेले प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. सुटतील असे वाटत नाही.

बहुधा तेंडुलकरांना हे माहित होतं म्हणूनच त्यांनी हे सत्य “अर्ध”च सांगितलं.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..