अरे माणसा माणसा ,नको असा अंत पाहू ,
जीवसृष्टी ज्यावर जगे,
त्या निसर्गा नको तोडू ,–!!!
अरे माणसा माणसा,
जगू देत वल्ली तरु,
प्राणांसाठी संजीवन असे,
नको त्यास दुर्लक्षित करू,–!!!
अरे माणसा माणसा,
पाणियाला चल वाचवू ,
जलस्त्रोत जगातले सारे,
वाया नको असे घालवू ,–!!!
अरे माणसा माणसा,
धरणीवर घाव नको घालू ,
काळी आई पिकवे सोने,
बेकदर इतका नको होऊ,–!!!
अरे माणसा माणसा,
वने सारी चल जगवू ,
आपमतलबासाठी तू ,
उगीच मस्ती नको दाखवू ,–!!!
अरे माणसा माणसा,
प्राणी बळी नको देऊ ,
शाप मूक त्या जीवांचे,
नको ओढवून घेऊ ,–!!!
अरे माणसा माणसा,
नसते उद्योग नको करू,
वाढवण्यासाठी सारी पिके,
रसायने नको ओतू ,–!!!
अरे माणसा माणसा,
निसर्ग आहे *श्रेष्ठ गुरु ,
विज्ञानाच्या लागून मागे,
नको विनाशाची कांस धरू ,–!!!
अरे माणसा माणसा,
नको निसर्गास कोप देऊ,
कल्याण करत जगाचे ,
चल त्यास आपण *विनवू ,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply