नवीन लेखन...

अरे संसार संसार

माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याच्या मनात काय चालले आहे हे सहसा समजत नाही, परंतु त्याचे हावभाव , त्याच्या हालचाली यावरून काही अंदाज बांधता येतो. मानवी मन हे तसे दुर्बोधच . एक स्त्री जोपर्यंत आई असते तो पर्यंत ठीक असते परंतु ती आई , बायको किंवा सासू झाली की त्याच्यात आमूलाग्र बदल होतात तसे बदल सहसा पुरुषात होत नाहीत, भारतात अपवाद हा प्रत्येक गोष्टीला असतोच असतो. आपण या ‘ अरे संसार …संसार…? ‘ या मालिकेतून मानवी मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अर्थात , कोणी दुखावले किंवा कुणाला आपल्यावरच लिहिले आहे असे वाटू शकते , त्यांनी वाईट वाटून घेऊ नये तर स्वतःचा त्रयस्थपणे विचार करावा. जर आपल्यात काही सुधारणा घडवू शकलात तर तो तुमचाच विजय ठरेल.

फ्रॉईडपासून अनेकांनी मानवी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि अद्यापही चालू आहे. फ्राईडने त्याचवेळी सांगितले होते २१ व्या शतकात सायकॅट्रिकची गरज सतत भासणार आहे, आणि आपल्याला सतत हे जाणवत आहेच कारण दोन-चार घरटी एक असा मनातून खचेलला, नैराश्य आलेला, आपल्याला डोळे उघडे ठेवून बघीतले तर आढळेल. असे का होते तर आपल्या आशा , इच्छा वाढलेल्या आहेत का , किंवा आपण स्वतःला अतिशय असुरक्षित मानतो किंवा स्पर्धा अशी अनेक करणे आढळून येतात. सर्वप्रथम माणसाने आपला स्टेटस सिबॉल स्वतःच ठरवलेला असतो तो दुसऱ्याबरोबर तुलना करून. आधी नेहमी एखाद्या पायवाटेप्रमाणे किंवा एक सरळ रस्त्याप्रमाणे भासणारे आयुष्य पुढे , हायवेवर जर गावाच्या नावाच्या पाट्या किंवा दिशादर्शक नसतील आणि तुमच्याकडे जी .पी. ऐस. नसेल तर तुमची काय अवस्था होईल याचा विचार करा.

आपले आयुष्य , संसार सुरु झाला की ह्या पायवाटा नि रस्ते पार एकमेकात अडकतात आणि गुंततात आणि तो गुंता इतका वाढतो की तो कोर्टाच्या दारात नेऊन ठेवतो तर कधी आत्महत्या किंवा आणखी काहीव्यसने .

हे पुढे असेच घडत राहणार , कोणी म्हणेल पूर्वी असे नव्हते तर त्याची ती घोडचुक आहे कारण पूर्वी स्त्री-पुरुष दबून होते ते एकत्र कुटूंबपद्धतीमुळे, त्यावेळी आईवडील किंवा मोठा भाऊ यामुळे ते ‘ पाणी ‘ शांत वाटत होते . आत्ता एकत्रकुटूंबपद्धती मोडकळीस आली आणि मग हे ‘ शांत पाणी किती खोल आणि किती गढूळ ‘ आहे हे जाणवू लागले , इतकाच फरक आहे.

त्यामध्ये भर म्हणजे ‘ मी माझे आणि मला माझे ‘ ही भूमिका इतकी प्रबळ झाली कि ‘ आपले ‘ हा शब्द शब्दकोशातून नष्ट होत आहे की काय असे वाटू लागले आहे. सर्व मूल्यमापन पैशात होऊ लागले. नवरा रिटायर झाला आणि पत्नी नोकरी करत असेल , मुलगा थोडेफार कमवत असेल नवरा हळूहळू बाजूला पडू लागतो , तो सक्षम नसेल तर तो बाराच्या भावात गेलाच म्ह्णून समजावा , आणि मग तिथून वेगळे प्रॉब्लेम सुरु होतात. नीट पाहिले तर संसाराचा तंबू एक खांबी असेल आणि स्त्री तो प्रमुख खांब असेल तर निश्चित तो डोलारा किती काळ राहील ?

हा प्रश्न विचारण्याचे कारण लगेच समजेल , आधी पासून ‘ मी आहे म्ह्णून संसार केला ‘ असे म्हणणारी स्त्री अशा वेळी मात्र निश्चित आक्रमक होते आणि पूढे काय ते सांगायलाच नको. ती सगळा आयुष्याचा परतफेडीचा हिशेब घेऊन तयारच असते. एक वेळ कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कला व्हायरस लागेल पण तिच्या मेंदूवर कोरलेल्या लग्नाच्या पाहिल्या दिवसापासूनच्या तिला न पटलेल्या , न आवडलेल्या गोष्टी रेकॉर्ड झालेल्या असतात. त्या कधीच करप्ट होत नाहीत.

त्याचे उट्टे ती कधी न कधी काढण्याचा प्रयत्न करते. आत्ता तुम्ही म्हणाल मी स्त्रियांच्या विरुद्ध लिहित आहे तर तसे अजिबात नाही , अनेक पुरुषात देखील असे ‘ स्त्री-गुण ‘ पुरेपूर भरलेले असतातच.

पुढल्यावेळी दुसरे काही संसाराबद्दल पण सविस्तर…..

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..