![p-40868-Arjun](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2017/08/p-40868-Arjun.jpg)
।। गजदन्ताय नम: अर्जुनपत्रं समर्पयामि ।।
ह्याचा २०-२५ मीटर उंच वृक्ष असतो.काण्ड सरळ वाढते व त्याची त्वचा पांढरी,गुळगुळीत व आतून नाजूक,मोठी व तांबूस रंगाची असते.पाने ५-९ सेंमी लांब व आयताकार असतात.फुले पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाची मंजीरी स्वरूपात असतात.फळ २.५-३ सेंमी व्यासाचे पक्ष युक्त असते.
ह्याची त्वचा उपयुक्त असते.आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात ह्याची चव तुरट असून थंड गुणाचा असतो.तसेच हा हल्का व रूक्ष असतो.हा हृदयाला हितकर असतो.हा कफ पित्तनाशक वातकर अाहे.
चला आता अर्जुनाचे उपयोग पाहूयात:
१)जखमेमधून रक्तस्राव हो असल्यास व जखम भरून येण्यास ह्याचा रस किंवा चुर्ण जखमेवर लावतात.
२)अर्जुनामुळे हृदयाचे पोषण सुधारते,हृदयाच्या पेशींना बळ मिळते व त्यामुळे वाढलेले ठोके कमी होण्यास मदत होते.
३)फ्रॅक्चर झाला असता इतर उपचारांसह अर्जुन चुर्ण दुधासह दिले असता फायदा होतो.
४)बायकांच्या अंगावर पांढरे जात असल्यास अर्जुनाचे चुर्ण द्यावे.
५)विविध त्वचारोगांमध्ये ह्याचा चांगला उपयोग होतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply