आपल्याकडे कुंकवाने दारावर, भिंतीवर लाल स्वस्तिक काढायची पद्धत आहे. मात्र स्वस्तिके वापरून आरोग्य सुधारता येते याबद्दल कोणतीही माहिती शास्त्रीय ग्रंथात उपलब्ध झाली नाही. मी एका लेखात वाचले की स्वस्तिकात खूप पॉवर असते. त्यावरून कल्पना सुचून मी इंद्रधनुष्याच्या सात रंगाची स्वस्तिके तयार केली. आणि असे लक्षात आले की, रंग किरण चिकित्सा आणि रंगीत स्वस्तिकाचे गुण साधारणतः सारखे आहेत.
ठराविक आकाराचे व रंगाचे स्वस्तिक शरीरावर योग्य ठिकाणी लावल्यास आरोग्य सुधारते असे अनुभव आले. लाल स्वस्तिक छातीवर ठेवले असता कफ कमी होतो. थंडीच्या दिवसांत लाल स्वस्तिकावर बसले असता थंडी कमी वाजते. पिवळे स्वस्तिक माकाहाडला लावले असता संडासला साफ होते आणि वात कमी होतो. फिक्यानिळ्या रंगाचे स्वस्तिक बेंबीवर लावले असता अॅसिडीटी, पित्ताचा त्रास कमी होतो. गर्द निळे स्वस्तिक बेंबीवर लावले असता पचन शक्ती वाढते. हिरवे स्वस्तिक उन्हाळ्यात टोपीमध्ये ठेवले असता उन्हाचा त्रास कमी होतो. अशा प्रकारे अभ्यास करवून घेऊन “आरोग्यदायी सप्तरंगी स्वस्तिके” असे पुस्तक २००७ साली परमेश्वराने माझ्याकडून लिहून घेतले. ते वाचून अनेकांनी स्वतः स्वस्तिके तयार करून वापरली तर अनेकांनी माझ्याकडून स्वस्तिकाचे सेट नेऊन ती स्वस्तिके वापरली आणि त्यांना फायदा झाला.
स्वस्तिके शरीरातील सात चक्रांना किंवा अवयवांना आजाराप्रमाणे किमान दोन तास ते दिवसभर लावावीत. स्वस्तिकाची रंगीत बाजू शरीराला लागली पाहिजे.
स्वस्तिकाला जे अधिकचे चिन्ह आहे. त्याची लांबी विषम संख्येत असावी. म्हणजे एक इंच, तीन इंच, सात इंच इ. स्वस्तिकांच्या भुजांची रुंदी लांबीच्या १० ते १२ टक्के असावी. स्वस्तिकाचे रंग इंद्रदानुष्याच्या रंगाशी मिळते हवेत. सध्या बाजारात उपलब्ध व्हायोलेट रंगात तांबडा रंग कमी आहे.तो जांभळा हवा. स्वस्तिक हे कागदावर (शक्यतो पांढरा), सफेद कापडावर, थार्मोकोलवर, पांढर्या प्लास्टिक शीटवर काढले तरी चालते. स्वस्तिक निट आखून घेऊन काढणे चांगले. यासाठी वाॅटर कलर, ऑईल पेंट, बाटिक पेंट, छपाई चे रंग व कोणत्याही प्रकारचे रंग चालतात. माझेकडे कार्ड पेपरवर छापून व लॅमिनेट करून घेतलेली स्वस्तिके तयार आहेत व ती चांगली उपयोगी पडत आहेत.
स्वस्तिक तयार करणे
स्वस्तिकाची लांबी व रुंदी पाच इंच पाहिजे. रेषांची जाडी अर्धा इंच. पांढरे कागदावर स्वस्तिक वाँटर कलरने काढून पुठ्याला चिकटवावे. नंतर प्लँस्टिकच्या पिशवी ठेवून वापरावे.लाल स्वस्तिक कुंकवात पाणी व थोडा डिंक किंवा फेवीकाँल घालून काढावे . तसेच पिवळे हळद वापरून काढावे.नंतर पुठ्यावर चिकटवून प्लँस्टिकच्या पिशवीत ठेवून वापरावे
अरविंद जोशी B.Sc.
९४२१९४८८९४
aarogaydayi swastik pustak kuthe milel.
आपला लेख आवडला,आरोग्यदायी स्वस्तिक हे पुस्तक कोठे मिळेल ?
आपला लेख लक्षणीय आहे, पुस्तक कोठे विकत मिळेल?