आपण सकाळी उठल्यावर ताजेतवाने राहावे यासाठी चहा किंवा कॉफी अशी अभारतीय गरम पेये सहज वापरतो ….
खर तर चहा आणि कॉफीमध्ये जी उत्तेजक द्रव्ये आढळतात ती बऱ्याच अंशी सौम्य विषेच आहेत …
सकाळीसकाळी उठून विषाचा प्याला तोंडाला लावण्यापेक्षा आपण एक बिनविषारी आणि आरोग्यपूर्ण चहा उर्फ “कषाय” बघूया …
भारतीय स्वयंपाक घरात वापरले जाणारे सर्व मसाले खूप अभ्यासपूर्ण आहेत ….त्यातलेच काही घटक वापरून आपण कषाय कसा बनवू शकतो हे पाहूया …
१) धने २०० ग्राम
२) जिरे ५० ग्राम
३) काळी मोठी वेलची २ नग
४) दालचिनी अर्धा इंच
सर्व पदार्थ वेगवेगळे भाजून घ्या आणि एकत्र साधारण भरड होईल इतके मिक्सरमधून बारीक करून घ्या .
नेहमीच्या चहाच्या पावडरीऐवजी ही पूड नेहमीच्या प्रमाणाच्या दुप्पट ( किंवा कडक चहा हवा असेल तर जास्त ) प्रमाणात वापरा आणि नेहमी करतो तसाच चहा करा . या कषायची चव चांगली तर आहेच मात्र नेहमी सवय लावून घेतल्यास कुटुंबातील सर्व आबालवृद्धांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नक्की मदत होईल ….
दोन वर्षापूर्वी हा कषाय आम्ही काही रुग्णांना घ्यायला सांगितला होता त्याचे काही फायदे
१) चहामुळे आम्लपित्त होत असेल तर कषाय हा उत्तम पर्याय आहे .
२) दिवसा चार-पाच (किंवा त्यापेक्षा जास्त ) कप चहा पिणाऱ्या लोकांनी सकाळी घरातून कषाय थर्मास मध्ये भरून नेला तर दिवसभरासाठी त्यांची चहाची तलफ भागू शकते .
३) दिवसातून अनेकदा घेतला तर काहीही दुष्परिणाम होत नाहीत उलट फायदाच दिसतो .
४) उत्साह दिवसभर टिकून राहतो .
तुम्हीही हा कषाय करून एक महिनाभर प्रयोग करून पहा आणि आम्हाला नक्की कळवा ….
— वैद्य राहूल काळे ,आयुर्वेदाचार्य .
आयुःसिद्धी ,
कळवा (ठाणे )
संपर्क क्रमांक : 07506178981
____________
Leave a Reply