मी माझे सर्वस्व तुला अर्पण करून
तुमचा निरोप घेईल
मुलांनो, मी माझी विनम्रता गिळंकृत केली आहे
मी माझी बनावट संपत्ती तुमच्या नांवे वारस ठेऊन जात आहे
मी महाज्ञानी आहे
मी नेहमीच गांभीर्य पांघरून फिरतो
मला प्रत्येक भेटणारा माणूस मूर्ख वाटतो
मी ही मुर्खता तुला स्वाधीन करून जात आहे
मी तुला माझे भरजरी वस्त्र,
माझे भाषा वैभव
आणि माझा अहंकार
तुला अर्पण करून निरोप घेईल
मी कचरा पेटीत फेकून दिली आहे
सारी सहजता आणि तरलता
मी गंभीर राहील त्या क्षणा पर्यंत
जो पर्यंत माझा सन्मान होत राहील
जरा कुठे माझ्या विरोधात सूर निघतील
तेव्हा पहा माझी मानसिकता, आक्रास्ताळेपणा
आणि शारीरिक हिंसा
माझ्या आत दडला आहे हिंस्त्र पशु आहे व
बाहेर मी एक आदर्श पुरुष आहे,
माझ्या मुलांनो तुम्हाला
अर्पण करील माझा हा दुटप्पीपणा
मी छता वरून लाँच झालेले
रॉकेट आहे
का मोडक्या झोपडीतून
हवेत फेकलेला भाला आहे,
मी काय होतो या पेक्षा
जास्त महत्वाचे आहे की
मी काय झालो आहे,
जे काही असेल ते
अर्पण करून निरोप घेईल
गल्लीत बलात्कार असो, दंगल असो
मी तुला माझा शेळपटपणा अर्पण करून
शिकवून जाईल
कसे शेपूट घालून
दार खिडकी बंद करून घरात रहावे,
शेजारील घरात गरीब मुले भुकेने मरत आहेत
तू मात्र गिळत रहा शिरापुरी भजे, सुका मेवा
मी तुला ही अव्वल निष्ठुरता
अर्पण करून निरोप घेईल
तुला पावलो- पावली दिसतील
अर्धनग्न मळकट पिचलेली
असंख्य बालके आणि बाया
तू त्याकडे दुर्लक्ष करीत
तुझी किमती बनारस साडी
आणि पॅन्ट सावरीत
अलगद निघून जा
मी तुला ही महान बेफिकीरी निर्लज्ज-परंपरा अर्पण करून निरोप घेईल
माझे साहित्य जगात वाचले जाते
अनेक भाषेत माझ्या पुस्तकांचा
अनुवाद झाला आहे
या अहंकाराच्या दुनियेत फुगून जाईल
आणि हीच हवा तुझ्या डोक्यात भरून
मी तुझा निरोप घेईल
माझे जे जे काही आहे
ते ते तुला अर्पण करून
तुमचा निरोप घेईल
— मूळ हिंदी कविता-
~अनामिका अनु
मराठी अनुवाद- विजय नगरकर
Leave a Reply