आर्थर मॅकन यांचा जन्म ३ मार्च १८६३ रोजी मॉनमथशरमध्ये झाला.
आर्थर मॅकन हे १८९०च्या दशकातला श्रेष्ठ भयकथांचा लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची १८९४ सालची ‘द ग्रेट गॉड पॅन’ ही दीर्घकथा ही आदर्श भयकथा म्हणून नावाजली गेली आणि स्टीफन किंगसारख्या मातब्बर लेखकाच्या मते तर, ती इंग्लिश भाषेतली सर्वोत्तम भयकथा ठरावी! ‘द थ्री इम्पोस्टर्स’ आणि ‘द हिल ऑफ ड्रीम्स’ या त्यांच्या कादंबऱ्या तुफान लोकप्रिय झाल्या होत्या.
दी व्हाइट पीपल, दी हाउस ऑफ दी हिडन लाइट, दी सिक्रेट ग्लोरी, दी टेरर, दी ग्रीन राउंड, दी शायनिंग पिरॅमिड, दी कोझी रूम, एल्युसिनिआ, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आर्थर मॅकन यांचे १५ डिसेंबर १९४७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply