नवीन लेखन...

सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर

काळी गोल टिकली. त्यावर भांगापर्यंत रेखाटलेली काळ्या कुंकवाची उभी रेघ. नाकात लकाकणारी चमकी. डार्क ब्ल्यू किंवा मरून रंगाची सिल्क साडी. काठ ठळकपणे उठून दिसणारे, हाती तंबोरा – मैफलीपूर्वीची डोळे मिटलेली ध्यानस्थ स्तब्धता. `आकाशवाणी धारवाड’ केंद्रावरचा फोटो वाटावा अशी आरती अंकलीकर – टिकेकरची प्रतिमा.

आरती अंकलीकर-टिकेकर यांनी आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि नंतर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९६३ रोजी झाला.त्यांच्या गायनशैलीवर त्यांच्या दोन्ही गुरुंचा प्रभाव जाणवतो. चांगलं गाता येण्यासाठी नैसर्गिक देणगी, संस्कार, कष्ट (रियाज) आणि संधी या चार गोष्टींची गरज असते. आरती अंकलीकर – टिकेकर यांना आवाजाची देणगी तर मिळालीच होती, जोडीला आईवडिलांचे संस्कार, गुरूंची आणि परमेश्वकराची कृपा यांमुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनंच केलं. आरती अंकलीकर-टिकेकर यांनी प्रथम वसंतराव कुलकर्णींकडे बारा वर्षं रीतसर आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या गाण्याचे शिक्षण घेतले. वसंतराव कुलकर्णी यांची आठवण सांगताना त्या म्हणतात. वसंतरावांकडचा सकाळचा नऊचा क्लाुस आठवतोय. मला पोचायला २-३ मिनिटं उशीर झाला असावा. सर त्यांच्या गादीवर तक्त्यााला टेकून बसलेले. पांढरे शुभ्र धोतर, पांढरा झब्बा, कुरळे केस व्यवस्थित विंचरलेले. समोरच्या तबकात तंबाखू, सुपारी, विड्याची पानं, सरांच्या अंगठ्याच्या नखात चुना, डाव्या हातात तळहातावर तंबाखू. मला पाहताच चेहऱ्यावर नाराजी. मला म्हणाले, “”घड्याळात पाहतेस ना किती वाजले?” मी- “”पण सर..” “”बस.. उशिरा आली.” सर – “”ख्यालाच्या आवर्तनामध्ये दुसऱ्या मात्रेवर समेवर येऊन चालेल का? वेळेचं भान नको का ठेवायला?” ताल म्हणजे काय, आवर्तन म्हणजे काय, याचा मिळालेला पहिला धडा होता तो. असे शिस्तप्रिय, वक्तशीर, मितभाषी, आतून खूप प्रेम करणारे, वरवर कोरडे वाटणारे सर.

वसंतराव कुलकर्णींकडे गाण्याचे शिक्षणानंतर त्यां गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या कडे गाणं शिकल्या. किशोरी आमोणकर यांच्या बद्दलचे त्यांचे भाव व्यक्त करताना त्या म्हणतात, किशोरीताईंकडे चाललेला यमन मनात रुंजी घालतोय, समोर दिसतोय, दरवळतोय, जिभेवरदेखील यमनचीच चव रेंगाळतेय. केवळ त्या आठवणींनी मन जणू यमनच झालंय. ताईंकडे यमनची तालीम चाललेली असतानादेखील असंच वाटायचं, मीच यमन झाल्यासारखं. सगळं जग यमन झाल्यासारखं वाटे. त्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतरदेखील यमनमध्ये तरंगल्याचा आभास होई. अंतर्मनामध्ये यमनच चालू असे. ताई म्हणत, “रागाला शरण जा, तोच तुम्हाला वाट दाखवेल.” ताईंचा श्वा स म्हणजेच संगीत. संगीत हेच जीवन. त्यांची गुरूवर अपार भक्ती. गुरू म्हणजे त्यांचीच आई- गानतपस्विनी – “मोगूबाई.’ ताईंनी शिस्तबद्ध गायकी पचवून आपली स्वयंभू, स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. रागाचं विशाल रूप त्यांना दिसलं आणि आम्हालाही त्याची अनुभूती दिली. मी स्वत: यमन होते तेव्हा काय घडत असतं, याचा साक्षात्कार करवला.
आरती अंकलीकर-टिकेकर यांनी नंतर आग्रा घराण्याचे अध्वर्यू मा.पं. दिनकर कैकिणी यांच्याकडे शिक्षण घेतले. पं. दिनकर कैकिणी यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणतात. यश म्हणजे काय? पैसा, नाव, कीर्ती मिळवणं म्हणजे यश; मनातली स्वप्न पूर्ण होणं म्हणजे यश; की श्रोत्यांना भावविभोर करणं म्हणजे यश? चांगला माणूस बनणं म्हणजे यश की यशस्वी कलाकार होणं म्हणजे यश? निरंतर साधनेत रमणारं मन घडवणं म्हणजे यश, की सातासमुद्रापलीकडे कार्यक्रम करणं म्हणजे यश? या विचारांच्या भोवऱ्यात मन भरकटत असताना आठवतो तो माझ्या गुरूंबरोबर गायलेला राग भैरव. पं. दिनकर कैकिणी- आग्रा घराण्याचे अध्वर्यू- त्यांनी भैरव शिकवला. खरं तर उभाच केला डोळ्यांसमोर. राग ही केवळ एक स्वराकृती नसून, तरल भावाचं एक वलय आहे. अलगद तरंगणारं, गायकाच्या आणि श्रोत्याच्या तरल मनाला तरंगवणारं. पं. कैकिणी गुरुजींची काही वाक्यंर इथं आठवतात

“शास्त्रीय संगीत हे मनोरंजनासाठी नसून आत्मरंजनासाठी आहे.’
“भारतीय संगीत हे दोन स्वरांना जोडणाऱ्या दुव्यात दडलेलं आहे.’

त्यांनी आत्तापर्यत भारतभर तसेच भारताबाहेर अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. आरती अंकलीकर-टिकेकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा आणि संस्कृतीचा जगभरामध्ये आपल्या गायनाद्वारे प्रसार केला. प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या `सरदारी बेगम’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायनही केले आहे. आरती अंकलीकर-टिकेकर यांना आत्तापर्यंत पं. कुमार गंधर्व पुरस्कार, पं. जसराज पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘संहिता’ या मराठी चित्रपटातील ‘पलके ना मूंदो’ या गाण्यासाठी आरती अंकलीकर-टिकेकर यांना उत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

मी राधिका मी प्रेमिका

ग्रेट भेटमधील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलाखत
http://www.ibnlokmat.tv/archives/65281
http://www.ibnlokmat.tv/archives/65279
सरदारी बेगम चित्रपटातील गाणी

https://www.youtube.com/watch?v=QAWHl2BKOJY

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..