कृत्रिम वंगणतेले ही संश्लेषित स्वरूपाची रसायने असतात. विशेष म्हणजे, ती वंगण-गुण नसलेल्या रसायनांपासून तयार करतात. ती सहसा पेटत नाहीत की गोठत नाहीत, त्यामुळे ती फार मोठ्या तापमानाच्या कक्षेत कार्यरत शकतात. द्रावणीयता राहू विष्यदंता (व्हिस्कोसिटी), अग्निरोधकता (फायर रिटाईंसी), अपायकारकता (टॉक्सिसिटी) इत्यादी बाबतीत कृत्रिम वंगणतेले खनिज वंगणतेलांपेक्षा कांकणभर सरस असतात. सिंथेटिक हायड्रोकार्बस, ऑरगॅनिक इस्टर्स, पोलिग्लायकॉल इथर्स, सिलिकाँस, सिलाँस, परफ्लुरोइथर्स, क्लोरोफ्लुरो कार्बंस हे वंगणतेलांचे काही प्रकार.
‘ही कृत्रिम वंगणे स्वयंचलित वाहने, खाद्यपदार्थ, रेफ्रिजरेशन, विमाने, हायड्रोलिक यंत्रे, व्हॅक्यूम पंप, कृत्रिम तंतुनिर्मिती, गीयर यंत्रभाग, ब्रेक फ्लूइड इत्यादी विविध ठिकाणी वापरतात. कृत्रिम वंगणतेले इंधनात खनिज तेलाप्रमाणे सहज मिसळत नाहीत, हा त्यांचा एक ठळक फायदा होय. तसेच, त्यांच्या टिकाऊ गुणधर्मामुळे ते जास्त काळ वापरता येतात. खनिज तेलापासून घनरूपातील वंगणे (ग्रीजेस) तयार करताना, त्यात मिसळलेला साबण उच्च तापमानाला वेगळा होतो. मग ते घनरूप वंगण द्रवरूप धारण करते व यंत्रभागावरून निसटून जाते. इथे, कृत्रिम ग्रीज बाजी मारते.
वेळोवेळी येणाऱ्या तेल संकटाने देशाला खूप मोठे आर्थिक हादरे दिले आहेत, पण या संकटाने तोट्याबरोबरच काही मोजके फायदेसुद्धा देऊ केले आहेत. नावीन्याच्या आविष्कारातून नवे शोध लागत आहेत. कृत्रिम वंगणाची निर्मिती त्यातलाच एक आविष्कार. ‘टेफ्लॉन’ हा पदार्थ बुळबुळीत ‘आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट कृत्रिम वंगण म्हणून मानला जाई. त्याच्या चलत व स्थिर घर्षणाचा सहगुणक (कोईफिशंट ऑफ फ्रिक्शन) ०.०४ आहे. १९६५ साली न्यू जर्सीतील ‘जनरल मॅग्नाप्लेट’ कंपनीने ‘हाय-टी-ल्यूब’ हे खास वंगण ‘नासा’साठी बनवले होते. काही वर्षांपूर्वी तिथल्याच ‘फ्युरोनिक्स’ कंपनीने ०.०२९ सहगुणकाचे ‘टफ ऑइल’ कृत्रिम वंगण बनवून रेकॉर्ड केला आहे. वंगणाच्या घर्षणावर मात करणाऱ्या बुळबुळीतपणाचा निचमत सहगुणक ०.०३ असू शकतो, असे मानले होते. त्यावर झालेली ही मात होय.
जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply