‘नयन तुझे जादूगार’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत मानापमान’ अशा विविध संगीत नाटकांतून व्यावसायिक रंगभूमीवर आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला.
मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकीआणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाट्यशास्त्राचे धडे घेतले. १९६४ साली त्यांनी ’यशवंतराव होळकर’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाटय़शास्त्राचे धडे घेतले. १९६४ साली आलेल्या ‘यशवंतराव होळकर’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यानंतर ‘नयन तुझे जादूगार’, ‘घनश्यान नयनी आला’, ‘बावनखणी’, ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकांबरोबरच ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत विद्याहरण’, ‘रामराज्य वियोग’, ‘संगीत शारदा’ अशा संगीत नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. नाटकातील अभिनयाबरोबरच संगीत प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे प्रसन्न व्यक्तिमत्त्व लाभलेले पिळगांवकर आजही नाट्यसंगीताचे धडे देण्यासाठी कुठेही जाण्यास तयार असतात.
संगीत रंगभूमीचा जिताजागता संदर्भकोश असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. १९६४ साली त्यांनी ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या ‘यशवंतराव होळकर’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतरचे त्यांचे महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘वासवदत्ता’. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘नयन तुझे जादूगार’ आणि’घनश्याम नयनी आला’ या दोन्ही संगीत नाटकांत त्यांनी प्रमुख भूमिका केल्या ‘नयन तुझे जादूगार’ मधील ‘उडुनी जा पाखरा’ हे त्यांचे पद अतिशय लोकप्रिय झाले होते. ‘साहित्य संघा’च्याच ‘धाडिला राम तिने का वनी’ या नाटकात त्यांनी भरताची भूमिका अप्रतिमपणे साकारली होती. त्यातील ‘कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला’ हे पद ते सुरेख सादर करीत.
‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘मानापमान’, ‘शारदा’, ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘कान्होपात्रा’ या संगीत रंगभूमीवरील सर्व महत्त्वाच्या नाटकांत अरविंद पिळगांवकरांनी भूमिका केल्या. ‘सौभद्रा’त त्यांनी सर्व प्रमुख भूमिका केल्या. ‘मानापमाना’त ते धैर्यधरही झाले आणि लक्ष्मीधरही झाले. ‘कान्होपात्रा’त चोखोबा आणि राजा अशा दोन्ही भूमिका त्यांनी केल्या. त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य म्हणजे ते विचारपूर्वक अर्थानुरूप गाणे पेश करत. गाण्यातील भाव उठावदार करत. ‘कान्होपात्रा’तील ‘जोहार मायबाप’ या गाजलेल्या पदाच्या चालीत त्यांनी किंचित बदल करून त्यातील भाव ठळक केले होते. त्यांनी पं. के. डी. जावकर यांच्याकडे प्रथम संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांचा सहवास त्यांना लाभला.
अभिषेकीबुवांना ते तंबोऱ्यावर साथ करीत. पं. गोविंदराव अग्नी हेही त्यांचे संगीतातले गुरू होते. अभिनयाचे पाठ मात्र त्यांनी दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या कडून घेतले. मामा वरेरकरांचे ‘हाच मुलाचा बाप’, विद्याधर गोखले यांचे ‘बावनखणी’ अशा वेगळ्या प्रकृतीच्या नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. परंतु रंगभूमीवरच्या अशा प्रत्यक्ष कामगिरीबरोबरच त्यांनी या रंगभूमीच्या प्रसाराचे काम अनेक प्रकारे केले. वृत्तपत्रांतून त्यांनी या रंगभूमीविषयी लेखन केले. ‘सौभद्र’ आणि ‘कान्होपात्रा’ या नाटकांच्या संकलित आवृत्त्या तयार केल्या. ‘साहित्य संघ’ आणि ‘विद्याधर गोखले प्रतिष्ठान’ या संस्थांतर्फे नाट्यसंगीत शिक्षणाचे मोलाचे काम त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply