असाच एखादा क्षण येतो |
सर्वस्व सारं घेऊन जातो |
थोडसं काही ठेऊन जातो |
त्याचंच नाव स्मत़ी असतं || १ ||
अशीच एखादी झुळुक येते |
स्वत:मध्ये सामावून घेते |
मध्येच दूर सरसावते |
त्याच नाव मिलन असतं || २ ||
अशीच एखादी सर येते |
तालावर ती नाच करते |
श़ंगाराने भिजवून जाते |
त्यालाच नाव प्रिती असतं || ३ ||
असाच एखादा काळ येतो |
सारं काही नष्ट करतो |
क्षणींच भंगण बनवितो |
त्याला कोणतं नांव असतं ? || ४ ||
— चंदाराणी कोंडाळकर
Leave a Reply