सामान्यांतूनी असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे,
कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे…..१,
उदार होवूनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा,
परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा……२,
जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना
व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा……३,
जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी
अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी….४,
निर्जीव सजीव सर्वांचि मिळूनी, उभारला संसार
हर घटकाने सहभागी व्हावे, लावूनी हातभार….५,
सर्व जगापरी जगत असतां, जगे इतरांसाठी
सामान्यातील असामान्य ठरेतो, ह्याच विश्वापाठीं……६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply