नवीन लेखन...

असे का व्हावे?

काल एका मालिकेत एका जोडप्याचा घटस्फोट होतो. आणि नतंर ती गळ्यातील मंगळसूत्र त्याला देते. कारण आता त्याची गरज नाही म्हणून. हे सगळे पाहतांना त्या बाईच्या मनातील भावना चांगल्या व्यक्त केल्या होत्या. आणि त्या नवऱ्याला काय वाटत होते ते पाहतांना मनात संमिश्र विचार सुरू झाले. मनापासून ठरवले होते घटस्फोट घ्यायचा. मग ते काढून देतांना मनाची चलबिचल का झाली होती? इतक्या वर्षाचा संसार मोडून टाकणे एका क्षणात शक्य नाही.खर तर हा विषय अतिशय नाजूक आहे
राग येतो कोणत्याही कारणाने आणि त्याचा कडेलोट झाला की सगळी बधंने तोडणे आवश्यक असते. दोन्ही बाजूंनी विचार केला तरी आपण एक निर्णायक मत देऊ शकत नाही. दिवसभर नवऱ्याच्या बरोबरीने काम करुन. चुलीपुढे बसावे लागतेच. आणि तो कष्ट विसरण्यासाठी दारू पिऊन तिलाच मारहाण करतो. तेव्हा तिला काय वाटत असेल. राग येणारच पण पदरात असलेल्या मुलासाठी सहन करते. हे फक्त तिथेच नाही तर अगदी उच्च शिक्षित प्रतिष्ठीत बाईच्या बाबतीतही घडू शकते. मंगळसूत्र काढून घटस्फोट झाला असे मानणे आणि पुढील आयुष्यात किती. काय काय निभावून न्यावे लागेल याचे नियोजन ठरले नाही तर खूपच अवघड असते. लोकनिंदा. वाईट नजरा. गैरफायदा घेणारे. आणि मुख्य म्हणजे लहान मुलांवर होणारे परिणाम. म्हणतात ना की लग्नाच्या वेळी तिच्या पदराला व त्याच्या उपरण्याला गाठ बांधली जाते. तो उपरणे टाकून जाऊ शकतो पण चार लोकात पदर काढून टाकता येत नाही. अगदी लहानपणीची काऊचिऊच्या गोष्टीत कावळ्यांचे घर वाहून गेले की तो कुठे ही आश्रय घ्यायला जातो. मात्र चिऊताईला अगोदरच मेणाचे पक्के घरटे बांधावे लागते. पिल्ले कुठे घेऊन जाणार? आणि कोण आधार देणार? मंगळसूत्र म्हणजे नुसते सौभाग्याची द्योतक नाही तर जबाबदारी पार पाडण्याची सतत जाणिव देणारे द्योतक आहे आणि ते एका क्षणात संपवून टाकणे फारच अवघड असते.
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..