कुणावर प्रेम करतेस, ते पाहायचंय्
स्वतःच्या भावनांवर
कि ओठातल्या शब्दांवर
नमलेल्या मित्रांच्या गर्दीवर
की कुणा वेगळ्यावर
निष्पाप तुझ्या डोळ्यांवरकी
तुला पाहणाऱ्या डोळ्यांवर
कुणावर प्रेम करतेस, ते पहायचंय्
नेहमी भिजणाऱ्या पावलावर
की नटलेल्या वनराईवर
मनाच्या संवेदनेवर
की कुणाच्या हृदयावर
राकट कुणाच्या देहावर की कोवळ्या मनावर
कुणावर प्रेम करतेस, ते पहायचंय्
समोर असलेल्या शत्रुवर
की कुण्या मित्रावर
उंच उडणाऱ्या पक्ष्यावर
की बागडणाऱ्या पाखरावर
रम्य उगवतीवर
की शरद चांदण्यावर
कुणावर प्रेम करतेस, ते पहायचंय्
दान करणाऱ्या खळावर
की भजन गाणाऱ्या संतावर
मोक्ष मिळणाऱ्या मृत्यूवर
की आयुष्य देणाऱ्या जन्मावर
ओंजळीतल्या निर्माल्यावर
की उमलणाऱ्या फुलावर
कुणावर प्रेम करतेस, ते पहायचंय्
स्वतःच्या त्यागावर
की कुणी केलेल्या त्यागावर
तुझे असलेल्या जगावर
की तुझ्यादारी सोडलेल्या जगावर
तू केलेल्या प्रेमावर
की तुझ्यावर असलेल्या निस्वार्थी प्रेमावर
कुणावर प्रेम करतेस,
पहायचंय्
सौरभ सुभाष दिघे, पनवेल
Leave a Reply