आशा आणि अपेक्षा या दोन जुळ्या बहिणी….
जिथे जिथे आशा असेल तिथे तिथे अपेक्षा भेटणारच…
मनुष्यप्राणी आशेवरच जगतो… आणि सतत कसलीतरी अपेक्षा करतोच करतो..
माणुसच कशाला.. अगदी कोणताही प्राणी तेच करतो..
आपण कोणाकडूनतरी कसलीतरी अपेक्षा करतो.. आपल्याला आशा असते की आपली ती अपेक्षा पूर्ण होईल..
कधीकधी आशा आणि अपेक्षा अगदी १०० टक्के पावतात आणि सहजगत्या प्राप्त होतात..
पण कधीकधी अगदीच अपेक्षाभंग होतो..
आशा कधी निराशेत परिवर्तित होते ते कळतंच नाही..
अशावेळी अपेक्षाभंगाचं दु:ख होतं आणि ते पचवायला फार कठीण होतं..
अशी निराशा आणि अपेक्षाभंग आपल्या जवळच्या माणसांकडून पदरी पडला तर त्याचं दु:ख जास्त होतं..
पण मग सुखी रहाण्यासाठी काय करायचं ?
साधं.. सोप्प आहे..
“आशा”च करायची नाही.. म्हणजे निराशेला आपल्याकडे येण्याचं कारणंच नाही…
“अपेक्षा” ठेवायचीच नाही.. म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख पचवायची वेळच येणार नाही..
मी तेच करायला सुरुवात केलेय.. तुम्हीही करुन बघा..
आयुष्य जास्त आनंदी होईल !!
Leave a Reply