नवीन लेखन...

अशी जपा आपल्या प्रेमाची नाती

सध्या मोबाईलच्या युगात बरेच जण प्रत्यक्ष भेटणं कमी आणि सोशिअल मीडियावर चॅटिंग करण्यात  जास्त वेळ घालवतात तसेच सध्याच्या जगात बरेच जण स्वतःचा खूप विचार करतात पण आपल्या नात्यांना फारस महत्व देत नाही. सध्या सोशिअल मीडियाच्या जमान्यात आणि धावत्या आयुष्यात महत्वाची असणारी नाती हरवत चालली आहेत.त्याच नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स येथे देत आहे…
Image result for relationship
१) रिलेशन हे कुठलेही असो ते म्हणजे एक प्रकारची गुंतवकणूक असते त्यात आपल्या प्रेमाची, विश्वासाची, एकमेकांना अवघड काळात मदत करण्यासाठी, आनंदात सहभागी होण्यासाठी ही मोलाची नाती खूप महत्वाची आहेत.
२) आपल्या कुठल्याही नात्यामध्ये तुम्ही जितकं तुम्ही समोरच्याला द्याल तितकंच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही जितकं प्रेम आणि विश्वास दाखवाल तितकांच तो तुम्हालाही मिळेल. तसेच हे करण्यासाठी एकमेकांना समजून घेणं खूप महत्वाचे आहे.
३) मतभेत हे कमी अधिक प्रमाणात प्रत्येक नात्यामध्ये असतात म्हणून वाद घालत बसणं काहीच फायद्याचं नाही. अशा परिस्थितीत समोरचा बदलणार नसेल तर त्याच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःला बदला. हे जरा तुम्हाला पचवणं जड जाईल पण ह्यानेच तुम्ही सुखी व्हाल म्हणून एखाद्याकडून अपेक्षा करणं कमी करा.
४) सध्याच्या फास्ट लाइफमध्ये जवळ जवळ सगळीच नाती ही पैशावर चालत आहेत त्यामुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावून बसतो, म्हणून नात्यांमध्ये कधीही पैश्याचं मोजमाप येऊ देऊ नका.
५) बरेचदा नातं हे रक्ताचं आहे असं म्हणतात पण खरं नात म्हणजे जे मनातून जूळतं, एक रेशीम धागा जो अती ताणला तर तुटून जातो. म्हणून नात्याला खूप हळूवार आणि प्रेमाने जपा.
६) कोणी येईल आणि मला खुश ठेवेल या विचारात कधीच राहू नका आणि मी खुश नाही याचं खापर नात्यावरही फोडू नका कारण आपल्यावर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत हे सत्य स्वीकारायला शिका.
७) तुमचे रिलेशन कुठलेही असो ते नेहमीच विश्वासाच्या जोरावर सिद्ध करा ज्यामुळे  समोरच्याच्या मनात तुमच्याबद्दल फक्त प्रेमचं नाही तर अभिमानही जागा होईल.
८)  एखाद्याची गोष्ट जर आपल्याला पटत नसेल तर जरा शांतपणे विचार करा, आणि कळतं नकळंत तुम्हीही तसचं इतरांबरोबर वागत नाही ना हे तपासून पहा.
ह्या वर दिलेल्या सर्व गोष्टींचा जर तुम्ही नीट शांत मनाने विचार केला आणि तुमच्या वागण्यात सकारात्मक बदल केलात तर तुम्ही कुठलेही रिलेशन घट्टपणे जोडू शकता आणि टिकवूही शकता.
— संकेत प्रसादे

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..