कृष्णासम ही नटखट अवखळ
लाघवी कवीता हळूच पाऊली येते
मयुरपिसी मखमली मृदुल करांनी
अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ।।१।।
कदंबतरुच्या साऊलीत या
साक्षात बीज प्रतिभेचे फूलते
शब्दफुलांच्या या वटवृक्षावर
भावगंधले गीत कोकिळा गाते ।।२।।
कालिंदीच्या! डोहातूनी त्या
सुरेल, ताल सप्तसुरांची येते
राधे! बघ सामोरी कृष्णमुरारी
धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते ।।३।।
शब्दशब्द मनी भाव उमलता
वास्तव! हॄदयातूनी ओघळते
रसिक मनांच्या गाभाऱ्यातुनी
सोज्वळतेचे रूप! उजळूनी येते ।।४।।
— वि.ग. सातपुते(भावकवी)
9766544908
रचना :- क्र १२.
१२ – ०१ – २०२२
Leave a Reply