नवीन लेखन...

अशीही नोकरी

एका जगप्रसिध्द कंपनीला सि.ई.ओ. हवा असतो. त्यांचा सि. ई. ओ. निवृत्त होणार असतो. तोच नवीन सि. ई. ओ. ची मुलाखत घेणार असतो. परंतु मुलाखत ऑनलाईन होणार असते.

कंपनी एवढी प्रसिध्द असते की अनेक देशातले लोक त्या नोकरीसाठी अर्ज करतात. मुलाखतीच्या दिवशी त्या कंपनीचा सि.ई.ओ. सर्व उमेदवारांचे स्वागत करतो आणि म्हणतो “मी तुम्हाला अगोदर कामाचे स्वरुप समजावून सांगतो. या कंपनीत काम करायचे असेल तर पूर्ण वेळ काम करावे लागेल.”

सर्व उमेदवार माना डोलावतात. सि. ई. ओ. पुढे म्हणतो “या कामामध्ये सुट्टी मिळत नाही. अगदी सणासुदीला सुध्दा किंवा तुमच्या घरी काही समारंभ असला तरी सुट्टी मिळणार नाही हे मी तुम्हाला निक्षुन सांगतो.” सगळे उमेदवार नाराज होतात. तरी पुढे ऐकू लागतात.

“या कंपनीतील कामाचा व्याप वाढला की अधिक वेळ काम करावे लागेल. कदाचित रात्रभर सुध्दा काम करायची तुमची तयारी हवी. याशिवाय तुम्ही केलेल्या कामाचे कोणी कौतुक करणार नाही. तुम्हाला प्रमोशन वगैरे दिले जाणार नाही. ”

उमेदवार विचार करु लागतात की ही कुठल्या प्रकारची नोकरी आहे? सि.ई.ओ. पुढे म्हणतो “जर कोणी कंपनीत आजारी असेल तर तुम्हाला त्याला मदत करावी लागेल.”

सि.ई.ओ. व्हिडीयो कॉन्फरन्सिंग करत असल्याने उमेदवारांच्या चेहऱ्याकडे पाहू लागतो. सगळेजण नाराज दिसतात. काहीजण विचारतात “या कामाचा मोबदला काय मिळणार आहे? ” त्यांना अपेक्षा असते की अशा कामाचा पगार भरगच्च असणार.

सि.ई.ओ. अखेरचा वार करतो. तो सांगतो “या कामाला मोबदला नाही.. २४x७ असे हे काम आहे. पूर्णपणे मोफत करायचे आहे.”

सगळेच उमेदवार निराश झालेले त्याला दिसतात. ते सगळे संतापलेले आहेत हे ही त्याला कळते. तो गालातल्या गालात हसतो. सगळे उमेदवार एकाच वेळी जवळ जवळ ओरडतात “जगात अशी कुठली कंपनी आहे जी अशा प्रकारची नोकरी देते? ज्याचा पगार नाही, प्रमोशन नाही, सुट्टी नाही असे कुठले काम आहे? तुम्ही आम्हाला अशी एक तरी व्यक्ती अख्ख्या जगात दाखवून या जी या अटी व शर्तीवर काम करते.

सि.ई.ओ. म्हणतो ” अशी व्यक्ती तुमच्यातील प्रत्येकाला माहीत आहे. किंबहुना ती तुमच्या आसपास आहे.”

सगळेजण विचारात पडतात परंतु कोणाला त्या व्यक्तिचे नाव सांगता येत नाही. अखेर सि.ई.ओ. स्वतःच त्यांना सांगतो “तुम्ही तुमच्या आईला या शर्ती व अटींवर काम करताना पाहिले नाही काय? दिवसरात्र ती ‘तुमच्या सेवेत असते. तुम्ही आजारी पडलात तर रात्रभर ती तुमची सेवा करते. सणासुदीला आणि समारंभांना दुप्पट मेहनत घेऊन ती राबत असते. तुम्ही तिला कौतुकाचा एक शब्दही बोलत नाही. तरी ती नाराज होत नाही. तिला कधीच सुट्टी मिळत नाही. ती माणूस असल्याचे तुम्हाला जाणवत नाही. तिच्याकडून तुम्हाला कायम अपेक्षा असतात. जर ती हे काम करु शकते तर तुम्ही का नाही? ”

खरोखर हा विचार आपल्या सगळयांच्या मनात रुजला पाहिजे. आपण आईचे गोडवे कवितेतून गातो मात्र प्रत्यक्षात आईला कुठलाच सन्मान, कुठलीच सवलत देत नाही. तिच्याकडून आपण सर्व प्रकारच्या अपेक्षा करतो, मात्र आपण तिची कुठलीच अपेक्षा पूर्ण करत नाही. त्यावेळी आपल्याकडे खूप बहाणे असतात. ही गोष्ट सर्वांना आत्मचिंतन करायला लावेल एवढीच अपेक्षा.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..