आशिष खान देबशर्मा हे अली अकबर खान यांचे चिरंजीव, अलाउद्दीन खान हे त्यांचे आजोबा. सरोदवादक आशिष खान देबशर्मा यांचा जन्म ५ डिसेंबर १९३९ यांचा जन्म खाला. त्यांची मावशी, म्हणजे अन्नपूर्णादेवी. आशिष खान देबशर्मा यानी वयाच्या ५ व्या वर्षी आपल्या आजोबांच्या मार्गदर्शना खाली शिक्षण घेण्यास सुरवात केली, व पुढे अली अकबर खान यांच्या कडे तालीम घेतली. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी ऑल इंडिया रेडिओ नॅशनल प्रोग्राम मध्ये आणि व तानसेन म्युझिक संमेलन मध्ये आपल्या वडिलांसोबत आणि आजोबांबरोबर वादन सादर केले होते.
२००२ मध्ये त्यांना अमेरिकेतील इलिनॉय आर्ट्स कौन्सिलची फेलोशिप आणि २००५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००७ साली रोजी आशिष खान ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडमधील रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलोशिप मिळाली. आशिष खान देबशर्मा यांना २००६ सालासाठी त्याला “गोल्डन स्ट्रिंग्स ऑफ द सरोद” अल्बमसाठी ‘बेस्ट वर्ल्ड म्युझिक’ श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे.
आशिष खान यांनी जॉन बारम, जॉर्ज हॅरिसन, रिंगो स्टार, द बीटल्स, एरिक क्लॅप्टन, चार्ल्स लॉयड, जॉन हाडी, अॅलिस कोलट्रणे, एमिल रिचर्ड्स, डॅलस स्मिथ, डॉन पोप, जॉर्ज स्ट्रुनझ, अरदिशर फराह अश्या अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे. आशिष खान सध्या न्यू ऑरलियन्स संगीतकारांसोबत टिम ग्रीन आणि जेसन मार्सलिस यांच्यासारखे आशिष खान सध्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ आर्टस, लॉस एन्जेलिस, यूएस येथे भारतीय शास्त्रीय संगीताचे सहायक प्रोफेसर आणि अमेरिकेतील सांताक्रुझ येथे कॅलिफोर्निया विद्यापीठातील संगीत विभागाचे सहायक प्राध्यापक आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गोल्डन स्ट्रिंग्स ऑफ द सरोद
https://www.youtube.com/watch?v=_bpsXIJUxPI
Leave a Reply