नवीन लेखन...

अशोक आणि अमिन

Ashok and Amin

पोलीसांना गुंगारा देऊन, अशोक पोलीस चौकीतून पळाला. तो दगडी भिंतीच्या दिशेने धावत निघाला. पोलीसांनी अशोकला शोधण्याचा प्रयत्न केला,पण व्यर्थ!
अंधारात एका दगडावर अशोक चांगलाच ठेचकाळला.
त्याच्या उजव्या पायाच्या ढोपराला सणकून मार लागला. मस्तकात कळ गेली. ढोपर खरचटलं. रक्त भळभळू लागलं.
त्यावेळी डाव्या पायावर तोल सावरण्याच्या प्रयत्नात, डावा पाय ही मुरगळला.
अशोकने खिशातून रुमाल काढून, उजव्या ढोपराला गच्च बांधला. सावकाश उजव्या पायावर उभं राहात, त्याने डावा पाय दोन-तीनदा झटकला.
लंगडत-लंगडत, उड्या मारत, पायातल्या वेदना सहन करत,वाटेतले दगड-खड्डे चुकवत अशोक धावण्याचा प्रयत्न करत होता.
उजव्या पायाचा रक्ताने भिजलेला रुमाल धावताना थांबून तो घट्ट करत होता.
‘अम्मी काळजी करत असेल. अम्मी घाबरेल.
अमिनचं काय झालं असेल?
गुंडांनी अमिनला पाहिलं तर नसेल ना?
आणि…. ….
आणि अम्मी आम्हाला शोधायला बाहेर पडली तर…?’ असे अनेक विचार अशोकच्या डोक्यात घोळत होते.
अशोक, अमिन आणि अम्मीच्या काळजीने बेचैन झाला होता.

अशोक दगडी भिंतीजवळ पोहोचला.
दुखऱ्या पायाने त्याला भिंतीवर चढता येईना. सैल झालेला रुमाल त्याने घट्ट बांधला.
डावा पाय दगडावर घट्ट रोवला. एक खोल श्वास घेऊन, दोन्ही हाताने, ताकदीने त्याने आपलं शरीर वर उचललं. हवेतच कोलांटी उडी मारून, त्याने रेहमानपाड्यात धाडकन उडी मारली!!
पेट्रोल बॉम्ब, अॅसीड बॉम्ब आणि हत्यारं घेऊन रेहमानपाड्यातून काही गुंड,त्याचवेळी दगडी भिंतीवर चढण्याच्या प्रयत्नात होते.
अशोक दाणकन त्यांच्या अंगावरच पडला!!!

काळोखात, हे काय झालं? हे कुणालाच नीटसं समजलं नाही.
पण अशोक सावध होता. तो टुणकन उठला.
तोच,एका गुंडाने सुरा सरसावत त्याचा हात धरला!
पण अशोक काही भ्याड नव्हता. तो ताठ उभा राहीला.
एकंदर काय प्रकार झालाय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने सावधपणे आजूबाजूला पाहिलं.परिस्थितीचा अंदाज घेतला.
अशोक जरा जोरातच म्हणाला, “मला माझ्या अम्मीकडे जाऊदे. ती काळजीत असेल. चला,बाजूला व्हा…”
तोच तो गुंड, अशोकला दरडावून म्हणाला,“एऽऽऽऽ गप्प बस रे पोरट्या. एव्हढ्या रात्री कुठे गेला होतास?
खरं सांग…… नाहीतर आत्ताच कापून टाकीन!”
“पोलीस चौकीत गेलो होतो, तुमचे हे उद्योग सांगायला” असं म्हणत,अशोकने एकच सणसणीत ठोसा, त्या बेसावध गुंडाच्या पोटात हाणला.
त्याबरोबर ठऊऽऽऽफ,ऊंऽऽऽऽ ऊंफ…ठकरत तो गुंड विव्हळला. त्याच्या हातातला सुरा खाली पडला.
त्या गुंडाचा हात झटकून, लंगडत-उड्या मारत अशोक अंधारात पळाला.
ते सगळेच गुंड आता अशोकचा पाठलाग करू लागले.

अशोकला पळताना गुडघ्यात वेदना होत होत्या.
डावा पाय चांगलाच ठणकत होता.
रक्ताने भिजलेला रूमाल खाली घसरत होता.
प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.
तरीही अशोक लंगडत धावत होता.

अशोकला गुंडांची भिती वाटत नव्हती तर त्याला अम्मीची काळजी वाटत होती.
पाठलाग करणारे गुंड काही रेहमानपाड्यातले नव्हते. त्यामुळे गटारे ओलांडताना, वळचणीतून पळताना, अधे-मधे वळताना त्यांची तारांबळ होई.
पण,
“कुछ भी करके,हम उस बच्चेको खलास करेंगे,काट डालेंगे” असं ओरडत, ते अशोकच्या पाठी सुरे सरसावर, तलवारी उगारत धावत होते.
त्या गुंडांची डोकी फिरली होती.
ते बेभान झाले होते.
वेड्यासारखं वागणं त्यांना शहाणपणाचं वाटत होतं.
हातात शस्त्र घेऊन ते मतीमंद झाले होते.

अम्मीचं घर जवळ येताच,एका वळणावर,अशोकने त्यागुंडांना चकवलं.
खाली वाकत,दुखऱ्या पायावर थोडा जोर देत,अशोक वेगात पळाला;आणि अम्मीच्या दारावर जाऊन जोरात धडकला!
तिथेच कोसळला.
झटक्यात अम्मी उठली.
तिने दरवाजा उघडला.
अशोकला उचलून घरात घेतलं.
अशोकला पोटाशी धरलं. त्याला मायेने कुरवाळलं.
अमिनही आनंदाने अशोकपाशी आला. त्याच्या शेजारी बसला.

दार मात्र तसंच उघडं राहीलं!!

काळे कपडे घातलेले,तोंडावर रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी,सुरे व चॉपर घेतलेले गुंड ,सताड उघड्या दारातून धाडकन आत घुसले.
गळ्यात ताईत घातलेला त्या गुंडांचा बॉस, एक पाऊल पुढे आला.
खोलीभर नजर फिरवत त्याने अंदाज घेतला.
घोगऱ्या आवाजात,तांबरलेल्या डोळ्यांनी अशोककडे पाहात तो अम्मीला म्हणाला, “दे दो उसे! ये सालेको हम काट डालेंगे! बहुत होशियार समझता है खुदको. एक चॉपर की फटकसे पूरी होशीयारी खतम हो जाएगी.”

एका गुंडाने, तलवारीने खिडकीची काच उगाचच फोडली.
काच खळकन फुटली!
भयाण शांततेवर ह्या आवाजाने चरा उमटला!!
वातावरणात विचित्र तणाव निर्माण झाला.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..