त्या गुंडांचा तो खतरनाक बॉस प्रथम चाचरत म्हणाला, “अं… अं..।़ होय! आमचं चुकलंच काहीतरी.
होय आई, आम्ही गुंडच आहोत.
पण आता, आम्ही सुधारू शकतो? चांगला माणूस म्हणून जगू शकतो?
दुसरा गुंड म्हणाला,“सच…. सच… कहता हूँ माँ….हमने इतना कभी सोचा ही नही. लेकीन….
लेकीन….. हम अब गुंडे बन चुके है माँ!!
पहले हम भी अच्छे आदमी थे माँ.
लेकीन अब वहाँ वापस जानेका रास्ता नही है माँ..!
अब हम जिंदगीभर गुंडे ही रहेंगे…..”
तिसरा गुंड मधेच घाइघाईत म्हणाला, “हां हां माँ,ये बिलकूल सच कहा रहा है.
लेकीन.. .. क्या हम फिरसे अच्छे आदमी बन सकते है?
क्या सचमुच तुम हमे मदद करोगी?”
अम्मी प्रेमाने, त्या गुंडांना म्हणाली, “क्यों नही? मैं तुम्हे जरुर जरुर मदद करुंगी.
अभी भी मौका गया नही है.
अरे, आपण जर चूक कबूल केली, आणि चुकल्याबद्दल जर आनंदाने शिक्षा घेतली; तर…. तर ती चूक,चूक राहात नाही मुलांनो!
तुम्ही ही शस्त्र टाकून द्या.
पोलीसांच्या स्वाधीन व्हा. जेलमधे जाऊन शिक्षा भोगा.
जेव्हा तुम्ही सुटून परत याल, तेव्हा तुम्ही गुंड नसाल!
तेव्हा..
तुम्हाला जर कुणी काही बोललं, तर त्यांना मी ठणकावून सांगीन.
माझ्यावर विश्वास ठेवा.
क्षणभरच एक अनामिक शांतता घरभर पसरली.
गुंडांचा बॉस पुढे आला…..
त्याने आपली तलवार, अम्मीच्या पायाजवळ ठेवली……
आणि………….
तो गुडघ्यावर बसून ओक्साबोक्सी रडू लागला!!
त्याने अशोकला घट्ट मिठी मारली.
त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं.
डोळे पुसत तो अम्मीला म्हणाला, “मेरा….मेरा…लडका ऐसा ही है माँ! लेकीन अब…अब…वो मुझे गुंडादादा नही कहेगा ना माँ?
अपने दोस्तोंसे नही कहेगा ना, की मेरा बाप खूनी है.
नही कहेगा ना, की मैं गद्दार का लडका हूँ.
नही कहेगा ना की, मेरे हाथोंको किसी का खून लगा है.
मैं घर लौटने के बाद, आएगा ना मेरे पास?
नही भागेगा ना मुझसे दूर?
नही डरेगा ना मुझसे वो…?
माँऽऽ…..हम सब हमारे बच्चोंका प्यार वापस चाहते हैं माँ!
माँ….
हम सब अच्छे आदमी बनना चाहते है! तुम्हारे जैसे सच्चे भारतीय!!
माँ…
अब मैं जेल से लौटनेके बाद, मेरा बेटा मुझै गुंडादादा नही… …
प्यारेदादा कहेगा! प्यारेदादा!!
हां माँ,
अब मैं सबका प्यारा-दादा होऊँगा.
माँ..माँ..सचमूच तुमने हमारी आँखे खोल दी.”
प्यारेदादाला इतकं गहिवरुन आलं की, त्याला पुढे बोलताच येईना.
त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळघळू लागले.
अम्मीला सुध्दा आपले आनंदाश्रू अनावर झाले.
तिच्या पायाशी ठेवलेली तलवार रक्ताने माखण्या ऐवजी आनंदाश्रूंनी चिंब भिजून गेली!!
प्यारेदादाने अम्मीच्या पायाला हात लावून नमस्कार केला.
अम्मीने त्याला आशीर्वाद दिला.
त्यावेळी दुसरा गुंड म्हणाला, ”माँ हम गलत रास्तेपर फस गए थे.
अब हम जान गये,इन्सानियत ही असली धरम है!”
“सही है मेरे बेटे!
आपण सारे भारतीय आहोत, आणि माणुसकी हाच आपला धर्म आहे.” अम्मी असं बोलत असतानाच, बाहेर पोलीसांच्या शिट्या वाजल्या.
Leave a Reply