नवीन लेखन...

अशोक आणि अमिन

Ashok and Amin

इन्सपेक्टर प्रधान बाहेरूनच ओरडून म्हणाले, “खबरदार, हॅण्डस् अप, हात वर करा.
हातातली शस्त्र खाली टाका.
हालचाल केलीत तर गोळ्या घालू.
आम्ही तुमच्या बाहेरच्या साथीदारांना आधीच पकडलं आहे.”

पोलीस आले आहेत असं कळल्यावर,एक ही गुंड घाबरला नाही, कारण…
आता ते गुंड राहीलेच नव्हते.
आपली चूक सुधारण्यासाठी,चांगलं माणूस म्हणून जगण्यासाठी,ते खूशीने पोलीसांच्या स्वाधीन होणार होते.

इन्स.प्रधान हातात पिस्तूल घेऊनच धाडकन घरात आले.

आणि……त्यांचा, त्यांच्या डोळ्यावरच विश्वास बसेना!!…

‘दगडा सारखं काळीज असणाऱ्या त्या गुंडांचे डोळे पाणावलेले होते.
त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता.
अम्मीच्या पायाजवळ, तलवारी आणि चॉपर पडले होते.
तर गुंडांचा खतरनाक बॉस,अशोकच्या जखमेवर स्वत:चा रुमाल बांधत होता!!’…….
हे दृश्य पाहताना इन्स.प्रधानांना क्षणभर वाटलं, आपण स्वप्नं तर पाहात नाही ना?
त्यांनी लगेचच स्वत:ला सावरलं आणि अम्मीला विचारलं, ”हा काय प्रकार आहे? काही दगा फटका तर नाही ना?”
अम्मी प्रसन्नपणे हसत म्हणाली, ”छे छे प्रधान साहेब, त्यांना पश्चाताप झालाय! आता त्यांना ह्या पुढे गुंड म्हणून नव्हे तर चांगला माणूस म्हणून जगायचं आहे.
प्रधान साहेब, ह्यांनी सुधारण्यासाठी, आपण सर्वांनीच त्यांना मदत करायला हवी, नाही का?”
इन्स.प्रधान खळखळून हसत म्हणाले, “निश्चितच!! ह्यांना कमी शिक्षा व्हावी ह्यासाठी मी प्रयत्न करीन. त्यात मला आनंदच आहे.

प्यारेदादा अम्मीला हात जोडून म्हणाला, “मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, पुन्हा कध्धी कध्धी आम्ही वाईट वागणार नाही.
मातृभूमीशी बेईमानी करणार नाही.
माणूसकी विसरणार नाही.
तुमच्या सारखाच आम्हाला ही अभिमान आहे की आम्ही भारतीय आहोत!
पण अम्मी… …
ही आमची गोष्ट तू इतर मुलांना सांग. म्हणजे,आम्ही जसे चुकलो,तशी चूक ही मुले करणार नाहीत. आम्ही जसे फसलो, तसे ही मुले फसणार नाहीत.
आणि अम्मी.. .. ..
माझं आणखी एक छोटं काम कर,
माझ्या मुलाला सांग, मला एकदाच माफ कर.
मैं घर लौटूंगा प्यारेदादा बनकर…….”

प्यारेदादाला पुढे बोलणंच अशक्य झालं.
त्याला भरून आलं.
त्याला आवंढा गिळताना ही त्रास होऊ लागला.
त्याचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले.
इन्स.प्रधानांसोबत सगळेच हसत आणि निश्चिंत मनाने जेलकडे रवाना झाले.

खरं म्हणजे, जेलमधे जाण्या अगोदरच,
फक्त गुंडादादाच काय…तर, त्याचे साथीदार सुध्दा,
सगळ्यांचेच……
प्या रे दा दा झाले होते!!

— राजीव तांबे.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..