अष्टाक्षरी रचना
वावर
श्येतकरी ह्यो राबतो
वावरात दिनरात
बिया टाकीसन तिथं
उगीसन झाड येत
धनी जाय श्येतामंधी
रानी थापते भाकर
जाई शेतामंदी बाय
घर-दार ह्यो वावर
कायी शाल पांघरली
वरी घामाचा पाऊस
बीज माटीतले पाहा
येता,धनी करी हौस
काळी माय मागे बीज
दान देई लय लय
तिले माहा नमस्कार
तिच्या पुढं जीव काय
श्येवटची ओवी माह्या
शिवाराला केली हाय
त्यो पोशिंदा सर्वाईचा
शिवारच माही माय
सौ.माणिक (रुबी)
Leave a Reply