ज्योतिषविषयक माहिती व उपाय सांगणार्या या सदरात पत्रिकेतील विविध ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थानांविषयी माहिती दिली जाईल. या भागात पत्रिकेत मंगळ असलेल्या व्यक्तींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. हे साधे सोपे उपाय अवलंबून पहा….
प्रथम स्थानातील मंगळ – ज्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.
१ – मंगळवार उपवास करणे.
२ – दररोज हनुमान चालिसा वाचणे. मारुती दर्शन घेणे.
३ – नेहमी बरोबर लाल रंगाचा रुमाल ठेवणे.
४ – बेडरुम मध्ये लाल रंगाचा वापर अधिक करणे.
व्दितीय स्थानातील मंगळ- ज्यांच्या पत्रिकेत व्दितीय स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.
१ – मंगळवारी मारुतीला शेंदुर लावणे.
२ – पक्षांना गहु खायला घालणे.
३ – अशुभ बोलु नये.
४ – मंगळवार उपवास करावा.
तृतिय स्थानातील मंगळ – ज्यांच्या पत्रिकेत तृतिय स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.
१ – कर्ज काढू नये, कोणाला जामीन राहू नये.
२ – आईची व गाईची सेवा करावी.
३ – खोटे बोलू नये, कामात खोटेपणा करु नये.
४ – मुंग्याना साखर खायला घालावी.
चतुर्थ स्थानातील मंगळ – ज्यांच्या पत्रिकेत चतुर्थ स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.
१ – अपंगांना मदत करा.
२ – नोकरांना खुश ठेवा.
३ – चांदीचा तुकडा जवळ ठेवा.
४ – पंचधातुची अंगठी धारण करा.
पंचम स्थानातील मंगळ – ज्यांच्या पत्रिकेत पंचम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.
१ – अन्न दान करणे.
२ – घराजवळ लिंबाचे झाड लावणे.
३ – धान्य पक्षांना खाऊ घालणे.
४ – गेलेल्या व्यक्तींचे श्राध्द, विधी नियमीत करणे.
षष्ठ स्थानातील मंगळ – ज्यांच्या पत्रिकेत षष्ठ स्थानात मंगळ आहे. त्यांनी करावयाचे उपाय.
१ – गणपतीची उपासना करणे.
२ – आपल्या पेक्षा लहान व्यक्तीना भेट वस्तु देणे.
३ – सापाला दुध पाजणे.
(सातव्या ते बाराव्या स्थानातील मंगळाविषयी पुढच्या भागात.)
— सौ. निलीमा प्रधान
Leave a Reply