डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अथांग ज्ञानाचा सागर।।
अविरत कष्ट करूनी ठरती दलित तारणहार
।।धृ।।
घेउनी अतीउच्च शिक्षण,झाले तुम्ही विद्याविभुषित।।
भारतरत्न पुरस्कार मिळे हो आपणा मरणोत्तर।।
आपणास भुषविले पहा ना संविधानाचे शिल्पकार।।
अविरत कष्ट करूनी ,ठरती दलित तारणहार।।१।।
भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री हे बोधिसत्व।।
मुकनायक,प्रबुद्ध भारत यातून ज्वलंत अस्तित्व।।
दलितांप्रती आपुल्या मनी माया ममता अपरंपार।।
अविरत कष्ट करूनी,ठरती दलित तारणहार।।२।।
— सौ. माणिक दिलीप शूरजोशी
Leave a Reply