जगी काय मिळविले काय हरविले
अंती एकच प्रश्न अनुत्तरीत असतो
हव्यासापोटी किती, काय हरविले
सत्यभास हा जीवा अविरत छळतो
सारीपाट! उलगडता जन्मभराचा
अंती सारा सत्याचा हिशोब स्मरतो
झाले गेले, सारे जरी विसरुनी जावे
तरी सारा काळ नित्य समोर असतो
अंती पश्चातापाचे दग्ध दुःख अंतरी
जीव! क्षणक्षण निश:ब्दीच जगतो
जगण्याविना, न दूजा मार्गच कुठला
भोग प्रारब्धी जन्मभरी नित्य भोगतो
आज लोचनी सांजवेळ ती केशररंगी
सभोवारी आठवांचाच निर्झर वाहतो
— वि.ग.सातपुते ( भावकवी )
9766544908
रचना क्र. ४.
४ – १ – २०२२.
Leave a Reply