आपल्या भारत देशाला सर्वात जास्त जर, कुणी डिवचले असेल तर ते फक्त अतिरेकी कारवायांनी ! मग ह्या कारवाया दहशतवाद्यांचा असोत की नक्षलवाद्यांच्या, भारताचे यामुळे फार मोठे नुकसानच झालेले आहे. भारताचे नुकसान अंतर्गत कलहाने जेवढे झाले नाही. तेवढे या कारवायांमुळे झालेले आहे. मात्र या अतिरेक्यांचा समुळ नायनाट करतांना सुरक्षा यंत्रणेसोबतच सरकारच्याही नाकी नऊ आले आहे. त्यामुळे ही समस्या या प्रयत्नांनी सुटण्याऐवजी अन्य काही अनपेक्षित कारणे कोणती वयामुळे अतिरेका विरोधात केल्या जात असलेल्या प्रयत्नात कसे अडथळे येत गेलेत हे पाहणे आवश्यक आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद कसा उद्भवला याची कारणमीमांसा अनेक प्रकारे केल्या जाते. दोन्ही अतिरेकाची पार्श्वभूमी पूर्णत: वेगळी आहे. दोन्ही अतिरेकाची ध्येय वेगवेगळी आहेत. व ही ध्येय पूर्ण करण्यासाठी दहशतवादी व नक्षलवाद्यांनी संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे. कांही ठिकाणची परिस्थिती तर अशी आहे की आपण राहतो त्या ठिकाणी केव्हा भुसुरुंगाची पेरणी केली जाईल. या धास्तीनेच अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. देशाची सुरक्षा यंत्रणा राबविणारे विविध दलाचे सुरक्षा जवान, पोलीस, आणि इतर नागरीक या अतिरेकी कारवायांचे प्रमुख लक्ष्य बनले. आहेत. त्यामुळे त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, या समस्येचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करुन देखील त्यातून कोणतेही ठोस समाधान निघालेले नाही त्यामुळे अजूनही धगधगत्या निखार्यांवर जगण्याची पाळी अनेकांवर आलेली आहे व हे जर असेच चालत राहील तर सुरक्षा यंत्रणेचा व निरपराध बळी जाणार्या देशातील नागरीकांच्या कुटुंबाच्या संयम सुरक्षाशिवाय राहणार नाही यांचे परिणाम देशाला गंभीरपणे भोगावे लागतील दहशतवादाचे व नक्षलवाद्यांचे आताचे गंभीर परिणाम का भोगावे लागत आहेत. याची कारण मिमांसाही त्यासाठी आवशयक ठरते. दहशतवाद पसरवण्यामागे कट्टरतावाद हे मुळ कारण असले पाहिजे. कारण बहुतांश दहशतवादी एका विशिष्ट कट्टरतेमुळे प्रेरित होवून या त्यांच्या कट्टरतावादाला जेथे ठाम विरोध होतो.
केवळ त्याच प्रांतात ते धुमाकुल घालत आहेत. दक्षिण अफ्रिकेत दहशतवाद्यांनी धुमाकुळ घातल्याचे स्मरत नाही म्हणालयला क्रिकेट 20-20 वर्ल्डकपच्या वेळी अशा बातम्या उडत-आल्याही पण दहशतवाद्यांनी तसे केलेले नाही यात पुन्हा आणखी खोलात शिरले तर ज्या खेळांना लोकप्रियता अधिक आहे. तेथेच हा उपदव्याप करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयास असतो ही कट्टरता कशी निर्माण झाली हे देखील विचारात घेतले पाहिजे इराकमध्ये सद्याम हुसेनच्या राजवटीत अनेक अत्याचाराचे व काळ्या कारनाम्यांचे प्रकार उदयास आलेत सद्यामचा हा उद्यामपणा जगातल्या काही रिकामटेकड्या कट्टरतावाद्यांना आवडला आणि सद्याम त्यांच्या गळ्याला ताईत बनला परंतू शांततेने नांदणार्या राष्ट्रांना हा उद्यामपणा भावला नाही आणि अखेर सद्यामचा खात्मा झाला. रिकाम टेकड्यांनी मात्र सद्यामच्या पावलावर पाऊल ठेवायचे ठरविले आणिमग ओसामा बिन लादेन , मुल्ला ओमर, सारखे विलन उदयास आलेत त्यांना सद्यामने पाळलेल्या प्रवृत्तीवर अमेरिका ब्रिटन भारता सारख्या राष्ट्रांना नष्ट करण्याची स्वप्न पडू लागलीत भारतात तर त्यांनी अक्षरश: हिसेंचा क्रूर थयथयाट मांडला शेजारच्या पाकीस्तान राष्ट्रातील कशी कट्टरतावाद्यांनी आपल्या देशाला पत्कराव्या लागणार्या युध्दातील पराभवाच्या जखमा उकरुन काढण्यात त्याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी शेजारच्या बांग्लादेशाचीही मदत घेण्यास मागे पुढे बघितले नाही कारगिल युध्द काश्मीरातील घुसखोरी अक्षरधाम मंदिर, संसद आणि मुंबईतील रेल्वे व 26-11 चे हल्ले हे त्यातून निर्माण झालेले तांडव यादेशाला बघावे लागले. अमेरिकेने तर 9-11 चा अतिरेकी हल्ले नभूतो न भविष्यती असा अनुभवला आहे.
आता थोडंनक्षलवाद्यांच्या अतिरेकाकडे डोकावून बघू या दहशत वाद्यांच्या कारवायाची डोकेदुखी कमीच की काय म्हणून भारताला नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी देखील भंडावून सोडले आहे दहशतवादी व नक्षलवादी यांच्यातील क्रुरतेची तुलना करण्यापेक्षा नक्षलवाद्यांनी मांडलेल्या उच्छादामुळे निर्माण होणार्या देशातल्या परिस्थिती वरच भाष्य केलेले बरे राहील नक्षलवादी हे पूर्णत: भारतीय आहेत. तर दहशतवादी हे देशाबाहेरचे आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत. त्यांना देशाचे विभाजन हवे की प्रांताचे त्यांना देशात शांतता हवी की अस्थिरता त्यांच्या कारवायांतील नेमके कारण कोणते? या सर्व प्रश्नांची उकल होणे आवश्यक आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. असे सध्याचे चित्र आहे. नक्षलवाद का उद्भवला हे देखील कोणी ठामपणे सांगू शकत नाही. आता वर सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे या समस्या गुंतागुंतीच्या व जटील का झाल्यात त्यासाठी उद्भवलेली अनपेक्षित कारणे कोणती? हे पाहणेही आवश्यक ठरते पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दहशतवादी कारवायात आधीच्या तुलनेत घट झलेली असली तरी दहशतवाद समुळ नष्ट झालेला नाही त्याचा धोका भारताला कायम आहे. दुसरी गोष्ट अशी की नक्षलवाद देखील पूर्णत: आटोक्यात आलेला नाही त्यानेही आपला विस्तार वाढविलेला आहे. आता या समस्या गुंतागुंतीच्या होण्याला त्याबद्दल असलेली राजकीय सरकारी पातळी वरील उदासिनता अन् या विरुध्द होणार्या ठोस कारवाईतकेला जाणारा अनपेक्षित हस्तक्षेप लष्कराला आपले काम दहशतवादाविरुध्द करु देतांना जो काही अनावश्यक हस्तक्षेप होतअसतो तो दहशतवाद्यांना मोकळे रान करुन देण्यास कायदेशीर ठरतो तीच बाब नक्षलवाद्यांच्या बाबतीत आहे. सहानुभूती प्रदर्शीत करुन नक्षलवाद्यांच्या मानसिकता बदलविण्याचा रकारही काहीसा विचित्र वाटतो यामुळे या समस्या सुटण्या ऐवजी गुंतागुंतीच्या होत चालल्या आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे अन्यथा नुकत्याच मिळालेल्या संकेतानुसारदहशतवादी जर भारतातील नक्षल वाद्यांशी साटेलोटे करुन आपल्या योजना तयार करीत असतील तर परिस्थिती चिघळल्याशिवाय व आणखी गुंतागुंत निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही हे केवळ राजकारण्यांनीच ओळखता कामा नये तर जे याप्रकारात नाहक नाक खुपसत आहेत त्यांनीही हे गांभीर्य नव्हे तर धोका ओळखला पाहीजे!
— अतुल तांदळीकर
Leave a Reply