नवीन लेखन...

एटीएम मशीन

अलीकडच्या काळात आपल्याला फार वेळा बँकेत जायची वेळ येत नाही कारण पैसे काढण्याचे मुख्य काम हे तर एटीएम मशीनच्या मदतीने होत आहे. आपल्याकडे बऱ्याच उशिरा हे तंत्रज्ञान आले असले तरी प्रगत देशात त्याचा वापर अगोदरच सुरू झाला होता. एटीएम याचा अर्थ ॲटोमेटेड टेलर मशीन असा आहे. डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्सचा वापर करून एटीएम मशीनच्या मदतीने पैसे काढता येतात.

नोटा मोजून ग्राहकाला देणारे असे प्राथमिक मशीन हे जपानमध्ये शोधले गेले असले तरी अधिकृतपणे त्या मशीनच्या शोधाचे श्रेय हे डॉन वेटझेल यांना जाते. १९६० मध्ये टेक्सासमधील डॉक्युटेल कंपनीत काम करीत असताना त्यांनी हे मशीन तयार केले. अमेरिकेतील रॉकव्हिले येथे केमिकल बँकेत पहिले एटीएम मशीन बसवण्यात आले. त्यावेळी केमिकल बँकेने अशी जाहिरात केली होती की, २ सप्टेंबरला आमची बँक सकाळी नऊ वाजता सुरू होईल व परत कधीच बंद होणार नाही, त्या काळात ही बाब सर्वांना आश्चर्यचकित करणारी होती. एटीएम म्हणजे एक प्रकारे चकाचक टपरीतील कॉम्प्युटरच.

त्याला कीपॅड व पडदा असतो. विशिष्ट बटणे दाबून तुम्ही त्या यंत्राला आदेश देत असता, पण हे सगळे करण्याअगोदर तो तुमचा एक विशिष्ट संकेतांक (पिन नंबर) विचारत असतो व तो नेहमी गुप्त ठेवायचा असतो. एटीएम मशीन हे मुख्य नियंत्रकाशी मोडेमने जोडलेले असते. या मशीनमध्ये सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मॅग्नेटिक- चिप कार्ड रीडर, पिन पॅड व क्रिप्टोप्रोसेसर असे काही प्रमुख भाग असतात. एटीएमच्या मदतीने जसे पैसे काढता येतात तसे भरता येतात, पैसे दुसरीकडे पाठवता येतात अशा अनेक सुविधा त्यात आहेत. तुम्हाला अचानक केव्हाही पैशांची गरज वाटली तर रात्रीही तुम्ही पैसे काढू शकता. एटीएममधून पैसे काढताना एकाच व्यक्तीने आत जायचे असते याचे कारण दुसरी अनोळखी व्यक्ती तुमचा संकेतांक वापरून पैसे काढू शकते. काही सायबर चोरट्यांनी एटीएममधून दुसऱ्याच्या खात्यातील पैसे लांबवण्याच्या युक्त्या शोधून काढल्या आहेत, तसे करणे फार सोपे नसले तरी तशा काही घटना घडल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..