नवीन लेखन...

आत्महत्या समस्या की उपाय ?

शिर्षक वाचून हैराण झाला असाल परंतु हे आजचे वास्तव आहे हे कुणीही नाकारणार नाही. एखादी समस्या आली की आपण उपाय शोधतो अर्थात अनेक उपाय असतात ते थकले की माणूस त्या समस्यांना कंटाळतो आणि मग तो शेवटच्या उपायाकडे वळतो तो म्हणजे आत्महत्या.

आजपर्यंत अनेक डॉक्टर्स , समन्वयक उत्तम भूमिका निभावतात परंतु मानवी मन भन्नाट आणि प्रचंड वेगवान आहे.
काही आजारांना कंटाळतात तर काही समस्या मग त्या कोणत्याही असोत.

संवेदनेची तीव्रता महत्वाची असते. त्याचबरोबर मानवी मन तितकेच कठोर असणे आवश्यक आहे. आत्महत्या करणारे लोक जेव्हढे संवेदनशील असतात तितकेच मनाने कठोर असणे आवश्यक असते.

सामान्य माणसे , कलाकार, लेखक ज्या प्रमाणात आत्महत्या करतात त्या तुलनेत किती राजकारणी आत्महत्या करतात. खरेच याचा विचार करणे आवश्यक आहे , प्रसंगी क्षमता , संवेदना पण त्यांच्याकडे असते पण तितकीच झुंझाण्याची ताकदही त्यांच्याकडे असते अर्थात आपण त्याला कोणतेही ‘ नाव ‘ देवू शकतो.

याचा विचार कधी केला आहे का ? जरा माझा विचार भरकटला आहे असे वाटेल परंतु शिव्या, शापाचे रूपांतर ‘ ओव्यात ‘ करण्याची ताकद विलक्षण असते ती असणे आवश्यक असते परंतु माणूस संवेदनशील असेल तर मात्र तो आत्महत्या करायचा विचार करतो. पण तो क्षण फार लहान असतो , बस त्यावरच कंट्रोल ठेवणे जमेल का ? प्रश्नच आहे म्हणा ?

वेगळे वाटते ना..माणूस जेव्हा ऐकटा पडतो, स्वतः सर्वांना दूर करतो , तेव्हाच हा आत्महत्या नावाचा जंतू त्यांच्या शरीरात प्रवेश करतो.
किंवा त्याला पुढे रस्ताच दिसत नसतो.

समस्या प्रत्येकाला येतात परंतु आम्ही त्याआधी आमच्या डिमांड्स कंट्रोल करत नाही आणि मग दुष्टचक्र सुरू होते, त्या कंट्रोल करणे आवश्यक असते मग त्यात ‘ लोक काय म्हणतील ‘ हा शब्द पूर्णपणे काढून टाकला पाहिजे ह्या डिमांड शारीरिक आणि वस्तू , वास्तूच्या देखील असू शकतात.

तुम्हाला तुमची पाटी दररोज पुसता आली पाहिजे अर्थात ते शक्य नाही. मला अनेक जण नावे ठेवतात हा बडबड करतो. सहज बोलताना दोन चार शिव्या पुल देशपांडे यांच्या रावसाहेब सारख्या माझ्या तोंडात असतात. गंमत सांगतो माझ्या टीव्ही वर. अनेक वेळा live मुलाखती होतात माझ्या स्वाक्षरी छंदामुळे माझे मित्र काय, माझ्या घरचे देखील वाट बघत असतात हा कधी शिवी देतो. असे कधी होत नाही कारण तेव्हा माझा ताबा माझ्या जिभेवर व्यवस्थित असतो , ह्याला मी कंट्रोल म्हणतो. आपल्याला कुठल्याही गोष्टीवर कंट्रोल असावा अगदी सवेदने पासून आसक्ती पर्यंत , मग ती कुठलीही आसक्ती असो. तुम्हाला पटकन Detach होता आले पाहिजे. सतत Attach राहणे मग कशालाही ते नेहमीच घातक.

कॉलेज ला असताना मी जे. कृष्णमूर्ती जवळून पाहिले, जवळून ऐकले. खरे सांगू संपूर्ण जे. कृष्णमूर्ती पचणे अशक्य. मात्र कुठेही सतत Attach न राहणे महत्त्वाचे मनावर बिंबवले ते जेके यांच्या भाषणामुळे.

जे. कृष्णमूर्ती यांचे चरित्र मी शेवटपर्यंत वाचले. त्यांना दुर्धर आजार झाला होता पण त्यांनी सर्व उपचार शेवटपर्यंत घेतले, मला वाटते त्याचे रेकॉर्डिंग पण ठेवले आहे , कुठे ते माहीत नाही. त्यांचे एक विधान होते , हा देह संपवण्याचा मला अधिकार नाही, विलक्षण आहे सगळे.

मी स्वतःची एक वेगळी भूमिका मांडली मी दररोज रात्री ११ वाजून ५९ मिनिटे ५९ सेकंद झाले की मरतो आणि १२ वाजून १ सेकंदाने परत जन्माला येतो.

मला कालच्या शिव्या शाप यांचे विस्मरण होते..
म्हणजे मी बऱ्यापकी निर्लज्ज बनतो……अर्थात
या निर्लज्ज शब्दावर काही ठिकाणी बंदी येत आहे असे समजते.
सो गो टू हेल…..हीच माझी भूमिका असते…
किंवा होऊन होऊन काय होईल ही विचारसरणी जवी.
बघा जमते का ?
हाच उपाय मस्त आहे ना….
आत्महत्येपेक्षा…?

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..