मुर्तिजापूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते १९१९ मध्ये पुणे शहरास आले. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी मुर्तिजापूर येथे झाला.फर्ग्युसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे प्रयाण केले. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसु ह्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यानंतर कवी अनिल यांनी १९३५ साली विधिशाखेची पदवी घेतली, सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरु केला. त्यांची १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. तसेच पाठोपाठ १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली इथे मुख्याधिकारी या, आणि पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ह्या पदांवर नेमणुका झाली.
कवी अनिल यांनी हे असे मार्गक्रम करत असतानाच मराठी वाङ्मयात महत्त्वाचे योगदान दिले. कवी अनिल हे मराठीत मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून अधिक प्रसिद्ध असले, तरी त्यांनी प्रचलित केलेला ‘दशपदी’ हा काव्यप्रकार देखील तितकाच लक्षणीय आहे. सुनीत ज्याप्रमाणे चौदा ओळींचे असते, तशाच दशपदी कवितेत दहा ओळी असतात. अनिलांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले आहे. त्यांच्या ‘तळ्याकाठी’ आणि ‘जुई’ या दोन दशपदी कविता खूप गाजल्या. मा.अनिल यांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले असे. अनिल यांना १९७९ ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. कवी अनिल यांचे निधन ८ मे १९८२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply