सप्तसुरांनी ब्रह्मांड वेढिले
शब्दही आले नाचत नाचत…
चंद्रफुलांची उधळण झाली
निळ्यासावळ्या गगनात…
भावफुलांना ठावुक नव्हते
मनांतील हे आत्मरंग सात…
शब्द कोणते, भावरंग कोणते
हृदयी, प्रीती कुणाची गात…
आळविता गीतात सुरांना
गंधर्वाची तान अवकाशात…
प्रभु तुजपुढे लावियली मी
गाभारी निरांजनी फुलवात…
आता उजळू दे मनगाभारा
भावनांच्या निष्पाप मंदिरात…
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५१
८/१०/२०२२
Leave a Reply