रस्त्यावर, बस-ट्रेनमधे आपल्याला भेटणारी सर्वसामान्य माणसं आपल्याला त्यांच्या नकळत काय ‘दृष्टी’ देऊन जातात..! अट एकच, आपण त्यांच्याशी बोलायचं किंवा त्यानी बोलायचा प्रयत्न केला तर प्रतिसाद द्यायचा..
काल असाच रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी उभा होतो. चहावाल्याकडे नेहेमीप्रमाणे दोन-चार रिक्शावाले चहा पिण्यासाठी आले होते. त्याच्या रिक्शांच्या पलिकडे एक ‘आॅडी’ पार्क केलेली होती आणि त्या गाडीची किंमत काय असावी यावर त्यांची आपसात चर्चा सुरू होती..मी तिथे गेल्यावर चहावाल्याने मला विचारले की,’साब क्या प्राईस होगी उस गाडी की?’. मी सांगीतलं,’होगी चाली-पचास लाख’. मग पुन्हा त्यांची त्यावर चर्चा सुरू झाली.
मला गोष्ट सांगायचीय ती किंमतीची नाही. तर ‘आॅडी’च्या नांवाची. ‘आॅडी’ या महागड्या गाडीचं नामकरण रस्त्यावर वावरणाऱ्या लोकांनी ‘चार बांगडी’ असं सोप्प-सुटसुटीत करून टाकलंय. मी ज्याच्याकडे चहा पितो तो राजस्थानी ‘भट’ (रस्त्यावरच्या चहावाल्याला ‘भट’ असंच म्हणतात.) याच्या ‘आॅडी’ शब्द उच्चारण्याची लकब मला एक नवी दृष्टी देऊन गेली. तो आॅडीला गुजराती-राजस्थानी पद्धतीप्रमाणे ‘ओडी’ असं म्हणत होता.
त्याचं ते ‘ओडी’ म्हणनं मला ‘होडी’ म्हणून ऐकू आलं आणि मग लक्षात आलं की खड्यात रस्ता शोधायची पाळी आलेल्या मुंबईच्या पावसाळी रस्त्यात, आॅडी ‘होडी’सारखीच चालते की..
‘आॅडी’ला मुंबईत ‘होडी’ इतकं समर्पक नांव नाही ही नवी ‘दृष्टी’ मला त्याने नकळत दिली..!!
–गणेश साळुंखे
9321811091
Leave a Reply