देवपूजेचे वेळी देवापुढे नागवेलीची पाने व त्याच्यावर सुपारी ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न, मुंज आदी मंगलकार्यप्रसंगी देखील अतिथींना पान सुपारी देण्याची प्रथा आहे.
नागवेलीच्या पानांना विड्याची पाने व पोफळी झाडाच्या फळाला सुपारी म्हणतात. देठासहित असलेले विड्याचे पान आपल्या हृदयाचे प्रतीक म्हणून समजले जाते. हे पान हिरवेगार असून मनाला अल्हाद देणारे असते. विड्याच्या पानाला त्यात सुपारी व कात टाकून तो विडा भोजनानंतर मुखशुध्दिसाठी खाल्ला जातो. कारण विडा हा वातहारक व जंतनाशक असतो.
सुपारी ही मांगल्याचे व प्रेमभावाचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे अखंड सुपारी ही गणपती देवाची प्रतिमा समजून तिची पूजा करतात.
पत्निचे देहावसान झाले असता पती आपल्या कनवटीला सुपारी लावून धार्मिक कृत्य करतो. कारण सुपारी ही त्याची प्रतिधिनिक स्वरुपातील पत्नी मानली जाते.
सुपारीचे अनेक प्रकार आहेत त्यांपैकी मसालेदार सुपारी ही सर्वांना आवडते. सुपारी चघळण्यामुळे लाळ रस उत्पन्न होतो.
Leave a Reply