आपण आपल्या घरात नित्यनेमाने देवपूजा करत असतो. या देवपूजेमध्ये आपण अनेक वस्तूंचा उपयोग करत असतो. ही सर्व साधने आपल्या घरात असतात मात्र त्याविषयी जास्त माहिती बहुतेकांना नसते.
देवपूजेत आपण हमखास वापरतो त्या वस्तू म्हणजे ताम्हण, घंटा, निरांजन, समई, फुले, नरळ, हळद-कुंकू, पळी-पंचपात्र वगैरे. याशिवाय फुले, अक्षता, गंध, शंख, कलश, भस्म, अगरबत्ती, रुद्राक्ष, विविध प्रकारची पत्री यांचाही देवपूजेत वापर होतो.
देवपूजेत वापरल्या जाणार्या प्रत्येक साधनाला काहीतरी महत्त्व आहे. ही सर्व साधने अत्यंत पवित्र आहेत. या सर्व साधनांच्या वापरामुळे जी फलप्राप्ती होते त्याविषयीही आपल्याला बर्याचदा माहित नसते.
सध्या वास्तुशास्त्र आणि फेंगशुईचे प्रस्थ वाढलेले आहे. त्यामध्ये देलेल्या वस्तूंपासून लाभ होतो असा अनेकांचा समज आहे. काही प्रमाणात हे खरेही आहे. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीतील देवपुजेच्या विविध साधनांमुळेही आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होतात हे आपण लक्षात घेत नाही आणि उगीचच चायनिज वस्तूंच्या मागे लागतो. आपल्याच घरातील या शुभ साधनांचा श्रद्धापूर्वक वापर केल्यास आपल्याला सुख, समाधान, शांती आणि समृद्धी लाभेल यात शंकाच नाही.
शुभ गोष्टींची सुरुवात आपण ॐकाराने करतो. ॐ हे ब्रम्ह आहे. ॐ हे अक्षर संपूर्ण विश्वाचे प्रतिक आहे. ओम हा परब्रम्हाचा संकेत असल्यानें ब्रम्हाच्या सर्व रुपांचा म्हणजेच `व्यक्त आणि अव्यक्त’, `कालाधीन आणि कालातीत’, `दृश्य आणि अदृश्य’ रुपांचा वाचक आहे.
अध्ययनाला प्रारंभ करताना ॐ म्हणून “मला ब्रम्हप्राप्ति होवो” असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे देवपुजेची सुरुवातही ॐकाराने केली जाते.
`देवपूजेतील साधने’ या खास लेखमालेच्या माध्यमातून आपल्याला ओळख करुन दिलेय या सगळ्या पवित्र साधनांची. पौराणिक माहितीव्यतिरिक्त ऐतिहासिक आणि वैज्ञानिक माहितीही देण्याचा प्रयत्न इथे केलाय.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply