जन्म.९ फेब्रुवारी १९७०
महान ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याचा जन्म. पहिल्या आठ कसोटी सामन्यांमध्ये त्याला फारशी छाप पाडता आली नव्हती. पण नंतर त्याच्या कारकीर्दीने भरारी घेतली. वेग कमी करून ऑफस्टंप लाइनच्या किंचित डाव्या किंवा उजव्या बाजूची लाइन ‘पकडून’ मॅकग्रा गोलंदाजी करायचा आणि भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडायची. ताशी १२६ ते १३० किलोमीटर इतका माफक वेगही पुरेसा ठरायचा. यात मॅकग्राची नितांत सुंदर शैली त्याच्या प्रतिष्ठेत भर टाकायची.
मॅकग्राने इंग्लंडच्या माइक अँथरटनला १९ वेळा बाद केले. जो एक कसोटी विक्रम आहे. ब्रायन लाराची विकेट त्याने सर्वाधिक १३ वेळा घेतली. १९९९च्या वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडला त्याने टाकलेले चेंडू अफलातून होते. या प्रतिभावान फलंदाजांना बाद करण्यासाठी तसेच स्पेशल चेंडू मॅकग्रा अथकपणे टाकायचा.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply