दुसऱ्या महायुद्धाच्या ‘रम्य कथा’ लिहिलेले लेखक ॲलिस्टर मॅक्लिन यांचा जन्म २१ एप्रिल १९२२ रोजी झाला.
साहस कथा, त्यातही संरक्षण दलांवरील कादंबऱ्या ८ लिहिणाऱ्यांत ॲलिस्टर मॅक्लिन यांचे नाव फार वर होते. त्यांनी स्वत: दुसर्या महायुद्धात नौदलात सेवा बजावली आणि नंतर ते जपान्यांच्या कैदेत होते. सुटका झाल्यावर ते कादंबरी लेखनाकडे वळाले आणि नौदलाच्या पार्श्वभूमीवर एकापेक्षा एक अशा सरस सतरा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अत्यंत अचूक निरीक्षण व वाचकाला खिळवून ठेवणार्यास शैलीमुळे ॲलिस्टर मॅक्लिन यांचा खास वाचकवर्ग निर्माण झाला.
मॅक्लिन यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्टय म्हणजे त्यांचे नायक अगदी साधेसुधे; पण चिवट असतात. परिस्थिती त्यांना नेहमीच प्रतिकूल असते आणि हे नायक त्यातूनही मार्ग काढून ईप्सित साध्य करतात. मॅक्लिन यांची ‘द डार्क क्रुसेडर’ ही कादंबरी अशीच आहे.
त्याच्या कादंबऱ्यांवर युद्धपट निघाले, ते गाजलेही. त्यातलाच एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘व्हेअर ईगल्स डेअर’. ब्रायन हट्टन या दिग्दर्शकाने रीचर्ड बर्टन आणि क्लिंट इस्टवूड या जोडगोळीला घेऊन बनवलेला हा एक हिट चित्रपट.
ॲलिस्टर मॅक्लिन यांचे २ फेब्रुवारी १९८७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply