नवीन लेखन...

लेखक भाऊ तोरसेकर

सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक भाऊ तोरसेकर यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९४८ रोजी झाला.

भाऊ तोरसेकर यांचे पूर्ण नाव गणेश वसंत तोरसेकर होय. भाऊ तोरसेकर हे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.

भाऊ तोरसेकर यांचे शालेय शिक्षण डी. एस. हायस्कूल, सायन व महाविद्यालयीन शिक्षण डी. जी रुपारेल कॉलेज, माटुंगा येथे झाले. भाऊ तोरसेकर यांनी खरे आर्किटेक्चरमध्ये पदवी घेतलीय. पण भाऊंच्या पत्रकारितेमागच्या या आर्किटेक्टची गोष्ट लोकांना फारशी माहीत नाही.

भाऊ तोरसेकर यांनी १९६९ मध्ये आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा येथून पत्रकारितेच्या कारकीर्दीला सुरुवात केली. भाऊ तोरसेकर यांनी साप्ताहिक भूपुत्र, ब्लिट्झ (मराठी), सकाळ (मुंबई) मधून पत्रकारीता केली. १९८५ ते १९८९ या काळात शिवसेनेचे मुखपत्र मार्मिक या साप्ताहिकातून कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर विवेक, चित्रलेखा यांसारख्या सप्ताहिकांमध्ये त्यांनी काम केले.

१९९४ ते १९९७ च्या दरम्यान ‘आपला वार्ताहर’चे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. भाऊ १९९८पासून स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करत आहेत. भाऊ तोरसेकर यांनी २०१० मध्ये ‘पुण्यनगरी’ दैनिकातून उलट तपासणी हे सदर चालवलं.

जागता पहारा या नावाचा त्यांचा एक ब्लॉग आहे. तसेच त्यांचं ‘ प्रतिपक्ष ‘ नावाचे यूट्यूब चॅनेल आहे. भाऊंच्या ‘जागता पहारा’ या ब्लॉगवर ७५ लाखाहून अधिक वाचक आहेत.

भाऊंची लोकप्रिय कोरी पाटी, मोदीच का?, राहुल विरचित महाभारतातील उरफाटा घटोत्कच (राहुल गांधींवरील पुस्तक), अर्धशतकातला अधांतर: इंदिरा ते मोदी, कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट, महाराष्ट्राचा महाजनादेश ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..