गेल्या वर्षी म्हणजे १७ मे रोजी रत्नाकर मतकरी यांचे निधन झाले. म्हणता म्हणता वर्ष झाले , रत्नाकर मतकरी यांना पहिल्यांदा लोककथा ७८ च्या वेळी पाहिले आणि कोण कोणत्या कार्यक्रमातून पहात होतो ऐकत होतो. मी डोबिवलीला स्वाक्षरीचे घर निर्माण केले , तेथे अनेक दिग्गज लोकांनी तेथे येवून भीतीवर स्वाक्षऱ्या केल्या. एक दिवशी रत्नाकर मतकरी डोबिवलीला आलेले होते , त्याचा बरोबर माझे चित्रकार मित्र सतीश भावसार होते. मी भावसरांना विनंती केली आणि ते रत्नाकर मतकरी यांना माझ्या डोबिवलीमधील टिळकनगर येथे असलेल्या स्वाक्षरीच्या घरात आणले . तेथे त्यांनी स्वाक्षरी केली हे माझ्या त्या स्वाक्षरीच्या घराचे भाग्यच म्हणावे लागेल.
आज ते घर भारतातील एकमेव ठरलेले असून त्याची नोंद लिम्का रेकॉर्डमध्येही झाली आहे.
नंतर काही वर्षाने माझा फोटाग्राफर मित्र सौरभ महाडिक मला म्हणाला अरे मी मतकरी सरांचे फोटो काढले आहेत मी अनेक वेळा त्यांना भेटतो , त्याच्या घरी जातो. सौरभने जे फोटो काढले आहेत ते इतके अप्रतिम आहेत की आता आणि भविष्यात कोणत्या ना कोणत्या कोणत्या कारणाने अनेकांना बघावयास मिळतील.
मी सौरभला विनंती केली मला त्यांचे घर बघावयाचे आहे .वेळ ठरली आम्ही मतकरी सरांच्या घरी गेलो त्याच्या पत्नी प्रतिभा मतकरी देखील होत्या , खूप गप्पा झाल्या , त्याची लिखाण करण्याची खोली बघितली , ते कसे लिहीत असत ते पण लक्षात आले.
बाजूला भिंतीवर माधव मनोहर यांचा फोटो होता. सुप्रसिद्ध समीक्षक माधव मनॊहार त्यांचे सासरे होते.
बोलता बोलता मी त्यांना म्हणालो तुमची स्वाक्षरी माझ्याकडे आहे आपण मला काही वेगळे द्याल का ? त्यांनी मला त्यांची दोन हस्तलिखिते माझ्या संग्रहासाठी दिली त्यात ‘ जादू ‘तेरी नजर या नाटकाचे हस्तलिखित होते, त्या दोन्ही हस्तलिखितांवर मी त्यांची स्वाक्षरी घेतली.
त्यानंतर ते ठाण्यात दोन तीन वेळा भेटले , आरण्यक नाटकाच्या वेळी भेटले .
सहा महिन्यानंतर त्यांचे १७ मे २०२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply