पत्रकार, लेखक हंटर थॉम्प्सन
हंटर थॉम्प्सन हे ‘गॉन्झो जर्नालिझम’ या नवीन विक्षिप्त संकल्पनेचा जन्मदाता होत. एखाद्या बातमीच्या किंवा घटनेच्या निवेदकाने, स्वतःच त्या घटनेचा किंवा प्रसंगाचा एक भाग होऊन, मनात एकामागोमाग एक उसळून येणाऱ्या विचारांच्या आवर्तनांना दिलेलं शब्दरूप असा काहीसा हा प्रकार. समजायला काहीसा क्लिष्ट. १९५६ ते ५८ अशी दोन वर्षं अमेरिकन एअर फोर्समध्ये काढल्यावर ते पत्रकारितेकडे वळले. […]