नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा नट रमेश देव

‘भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या. […]

लेखक ॲ‍लिस्टर मॅक्लिन

त्याच्या कादंबऱ्यांवर युद्धपट निघाले, ते गाजलेही. त्यातलाच एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘व्हेअर ईगल्स डेअर’. ब्रायन हट्टन या दिग्दर्शकाने रीचर्ड बर्टन आणि क्लिंट इस्टवूड या जोडगोळीला घेऊन बनवलेला हा एक हिट चित्रपट. […]

लेखिका अरुणा ढेरे

‘आदिबंध आणि स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबरी’ या विषयासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. पाच राज्य पुरस्कार, ‘मसाप’चे सहा पुरस्कार, बहिणाबाई प्रतिष्ठान, काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. […]

पं. मुकुंदराज गोडबोले

नुकताच संत सोपानदेवांच्या अभंगांचा त्यांनी संगीतबद्ध केलेला कार्यक्रम स्मरणीय होता. त्यांना ‘छोटा गंधर्व गुणगौरव’ पुरस्कार प्राप्त झाला होता. […]

ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यशास्त्राचे द्रोणाचार्य कमलाकर सोनटक्के

थोड्याच दिवसात सोनटक्केनी अल्काझींचे मन जिंकले. व ते त्यांचा जणू उजवा हातच बनले. अल्काझींच्या प्रत्येक कामात त्यांना सोनटक्केंचा सहवास भासु लागला. पहिल्याच वर्षी त्यांच्या ‘अंधायुग’ या निर्मितीचे स्क्रिप्ट इनचार्ज म्हणून त्यांनी काम पाहीले. अल्काझींच्या कामाची ताकद त्यांना जाणवत होती. एकदा तर पंतप्रधानांची कांही मिनिटासाठी असलेली भेट, त्यांनी संपूर्ण शो पाहून गेल्याची त्यांची आठवण होती. […]

जागतिक पाणथळभूमी दिवस

सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाऱ्यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. अतिवृष्टी झाल्यास अधिकचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशांत मुरते आणि मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते. […]

सरदार आबासाहेब मुजुमदार

आबासाहेब मुजुमदार हे स्व तः उत्ताम सतारवादक होते. तंतूवाद्यावर त्यांंची हुकूमत होती. ते केवळ पाच मिनीटांत तंबोरा लावत असत. ब्रिटीश कालावधीत ते फर्स्ट क्लास सरदार होते. त्या काळात सरदार, इनामदार, जहागिरदार या सर्वांचा मतदार संघ होता. आबासाहेब मुजुमदार त्यााचे प्रतिनिधित्वी करत. […]

‘ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ ची पहिली आवृत्ती

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शब्दकोश विभागाचा ‘शब्द’ ब्रिटिश इंग्रजीकरिता अंतिम मानला जातो. याला कारणही तसेच आहे. ‘फिलॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ या भाषाशास्त्राच्या संस्थेतील सभासदांनी १८५७ मध्ये तत्पूर्वीचे शब्दकोश अपूर्ण आणि सदोष असल्याने शब्दांचे पुनःपरीक्षण करून नवा शब्दकोश तयार करण्याचे ठरवले. प्रत्यक्ष कृती फार मंदगतीने होत गेली. अखेर १८७९ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसशी करार होऊन न्यू इंग्लिश डिक्शनरीच्या कामास सुरुवात झाली. […]

कराडचे कल्पना चावला विज्ञान केंद्र

केंद्रातली मुले जर एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यातील संकल्पना स्लाइड शो किंवा फिल्म्सच्या माध्यमातून समजून घेतात. काही तज्ज्ञ व्यक्तींना या संदर्भात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले विमानांच्या प्रतिकृती तयार करतात. […]

पत्रकार, संपादक अरुण टिकेकर

स्वतः अरुण टिकेकर हे दस्तुरखुद्द, टिचकीबहाद्दर अशा अनेक नावांनी सदरलेखन करीत असत. महाविद्यालयीन शिक्षण घेताना इंग्रजीत नाट्यसमीक्षा केल्यानंतर ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संदर्भ विभागात रूजू झाले. […]

1 109 110 111 112 113 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..