नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृती प्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. […]

श्रीधर माडगूळकर

प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. श्रीधर माडगूळकर यांनी १९७० साली ‘जिप्सी’ या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली. त्याचप्रमाणे ‘धरती’ व साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले. […]

ढेपे वाड्याचे संस्थापक नितीन ढेपे

वाडा या पारंपरिक भारतीय वास्तुरचनेमधील राहणीमान व त्यात नांदणारी संस्कृती नव्या पिढीला पर्यटनातून अनुभवता यावी, या उद्देशातून ढेपे वाडा वास्तू साकारण्यात आली. […]

मेजर थॉमस कँडी

मेजर थॉमस कँडी हे जन्माने ब्रिटिश असलेले लष्करी अधिकारी भारतीय भाषापंडित होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेले थॉमस त्यांच्या आयुष्याची शेवटची पंचावन्न वर्षे भारतातच राहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केलेल्या थॉमस कँडी यांनी भावाच्या मदतीने कॅप्टन मोल्सवर्थचे अर्धवट राहिलेले इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे काम पूर्ण केले. […]

लीप दिवस

आज लीप दिवसआजचा दिवस वर्षातील उर्वरित ३६५ दिवसांपेक्षा वेगळा आहे. याचं कारण म्हणजे २९ फेब्रुवारीचा दिवस चार वर्षांनी एकदाच येतो. […]

प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुधीर तेलंग

सुधीर तेलंग यांना लहानपणापासून व्यंगचित्रे काढण्याची आवड होती. सुधीर तेलंग लहानपणी तैलंगला टिनटिन फँटम आणि ब्लॉंडी यांसारखे कॉमिक्स पाहायचे. याची त्यांना भुरळ पडली होती. ज्याने त्याला व्यंगचित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित केले होते. […]

ध्वनिमुद्रिका संग्राहक जयंत राळेरासकर

आपण जयंत राळेरासकर यांना अवलिया म्हणू शकतो. जयंत राळेरासकर हे सोलापूरचे. शिक्षण बी. एस्सी. (ऑनर्स) असूनही त्यांची तब्बल ३० वर्षे नोकरी झाली ती सेंट्रल बँक ऑफ इंडियात. २००१ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नोकरी करता करता त्यांनी छंद जोपासला तो संगीताचा त्या मुळे १९९२ पासून सोसायटी आॕफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर मुंबई च्या संपर्कात राहिले. […]

वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर हे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे. […]

पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर

गणेश वासुदेव मावळणकर मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. […]

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास

आपल्या मलमली आवाजाने गझलप्रेमींना वेड लावणारे जगप्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांनी गझल गायकीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जात.त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले होती.१९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आई है..’ या गाण्याने पंकज उदास घराघरांत पोहोचले. […]

1 12 13 14 15 16 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..