लेखक वसंत वसंत लिमये
ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात असताना त्याला उनाडक्या करण्यातच रस होता. शाळेत नंबर एकतिसावा आला. वडील फक्त म्हणाले, “तिनावर एक एकतीस! यातला ‘तीन’ नंबर काढून टाकलात तर बरं!” त्रागा न करता एका ओळीत सांगितलेलं सूत्र चिरंजीव वसंताच्या मनात रुजलं आणि मग कुठलाही छंद चौफेर भटकत जोपासताना नंबर वनचीच गुणवत्ता दाखवण्याचा ध्यास ‘वसंत वसंत’ने घेतला. […]