नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

सही रे सही नाटकाची १९ वर्षे

१९ वर्षे हाऊसफुल्ल मनोरंजन करणारे मराठी रंगभूमीवरील नाटक “सही रे सही” केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘सही रे सही’ नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ ला झाला होता. अनेक विक्रम रचणाऱ्या या नाटकाची नोंद मराठी रंगभूमीवरील एक सोनेरी पान म्हणून झाली आहे. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. मधल्या […]

जयजयगौरीशंकर – पहिला प्रयोग १९६६

गोव्याच्या मंगेशीच्या देवळात १९६६ साली अवघ्या सहा वर्षांच्या ज्ञानेश पेंढारकरच्या हस्ते ‘जय जय गौरीशंकर’ या नाटकाचा मुहूर्त पार पडला आणि तिथून या नाटकाच्या प्रवासाला सुरुवात झाली. पं. राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार,, जयश्री शेजवाडकर यांसह आणखी तीन कलाकारांसोबत विद्याधर गोखले लिखित या नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली. नाटकाचे दिग्दर्शक होते नटवर्य मामा पेंडसे तर संगीत दिग्दर्शन […]

बॉलिवुड मधील लोकप्रिय हास्य कलाकार जॉनी लिव्हर

जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाशराव जनुमाला. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी कनगिरी, आंध्र प्रदेश येथे झाला. आंध्रप्रदेशातील एका तेलगु ख्रिश्चन कुटुंबात जॉनी लिव्हर यांचा जन्म झाला. जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा यांच्या सोबत मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. ते […]

याहू स्टार शमशेरराज ऊर्फ शम्मी कपूर

शम्मी कपूर यांनी गंभीर भूमिका म्हणता येतील, तशा फारशा भूमिका केल्याच नाहीत. एक मस्त कलंदर, काहीसा खुशालचेंडू तरुण अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. पण प्रेक्षकांना जसे गंभीर भूमिका करणारे अभिनेते हवे असतात, तसेच जीवनावर ओसंडून प्रेम करणारे, आनंदी, मन प्रसन्न करणारे अभिनेतेही हवे असतात. जे आपल्याला आयुष्यात करणे शक्य नाही, […]

मराठी लेखक, नाटककार, पत्रकार जयवंत दळवी

जयवंत दळवी हे वेंगुर्ल्यापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील आरवली गावचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी गोव्यातील हडफडे गावी झाला. जवळच्या शिरोडे गावी त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईला आले आणि घरच्या दडपणामुळे मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी अभ्यास करू लागले. पण डिप्लोमा अर्धवट टाकून मुंबईच्या ‘प्रभात’ दैनिकात ते रुजू […]

सिलसिला चित्रपटाची ४० वर्षे

सिलसिला चित्रपटाच्या प्रदर्शनास आज यशस्वी ४० वर्षे पूर्ण होत आहेत. १४ ऑगस्ट १९८१ रोजी हा चित्रपट प्रक्षेपित झाला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर ऑपेरा हाऊस होते, तेथे या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटाचे लेखन यश चोप्रा, प्रीती बेदी, सागर सरहादी आणि रोमेश शर्मा यांचे आहे. या चित्रपटाचे कथानक संजीवकुमार, शशी कपूर, अमिताभ बच्चन, जया बच्चन […]

अखंड भारत दिवस

अखंड भारत ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकिकरण होणे आपेक्षित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रिकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे साजरा केला जातो. प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रिकरण कमीवेळा झाले. […]

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर

जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी ओळख असलेल्या कुलदीप नय्यर यांनी देशातल्या नामवंत वृत्तपत्रांसाठी लेखन केले होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ रोजी पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये झाला. लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण आणि नंतर तेथील लॉ कॉलेजमधून त्यांनी एल.एल.बी.पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वकिलीचे शिक्षण घेऊन भारतात परतलेले नय्यर यांनी क्लार्क न होण्याचा निश्चय केल्यामुळे त्यांना […]

मुंबई उच्च न्यायालयाचा स्थापना दिन

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली. आज १४ ऑगस्टला या न्यायालयाची स्थापना झाल्याला १५७ वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाची इमारत हे आपल्या मुंबईचे वैभव आहे. मुंबई, मद्रास व कोलकाता येथील उच्च न्यायालयांच्या इमारती एकाच वेळी बांधल्या गेल्या आहेत. त्या वेळी भारतामध्ये या तिन्ही शहरांच्या ठिकाणी उच्च न्यायालये सुरू करण्यासाठी इंग्लंडच्या […]

भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव

जगातील सर्वोत्तम ऑलिम्पिक क्रीडा कुंभमेळ्यात भारताकरिता पहिले ऐतिहासिक वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये केला होता. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी झाला. महत्त्वाचे म्हणजे खाशाबाच्या पदकानंतर तब्बल ४४ वर्षे आपली वैयक्तिक पदकांची पाटी कोरी होती. कुस्तीतही पाच दशकांनंतर दुसरे पदक आले. फिनलंड देशाच्या राजधानीतील १५ व्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत […]

1 179 180 181 182 183 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..