नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग

चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजी झाला. अंतराळवीर बनण्याआधी नील आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि त्या वेळी त्यांनी कोरिया युद्धात भाग घेतला होता. ते एअरोस्पेस इंजिनीअर, नौदल अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापकदेखील होते. नौसेनेतील नोकरीनंतर आर्मस्ट्राँग यांनी पुरूडू विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर एका ड्रायडेन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झाले. तेथे […]

मुगल ए आझम

मुगलएआझम या चित्रपटाचा शुभारंभ ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात झाला. आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी एक लाखाहून अधिक मंडळी चित्रपटगृहाबाहेर जमली होती. उच्चभ्रू प्रतिष्ठितांना राजांच्या खलित्यासारखे, उर्दू निमंत्रण – फर्मान धाडण्यात आले होते. चित्रपटाची सर्व रिळे हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहात आणण्यात आली. चित्रपटगृहाबाहेर शीशमहालचा सेट आणून पुन्हा उभारण्यात आला होता. मुगल-ए-आझम बनवण्यासाठी के.असिफ यांना असंख्य […]

ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे

ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी गोव्यातील बांदिवडे गावी झाला. आपल्या अथक परिश्रमांच्या बळावर ज्यांनी ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं. त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या पिढीतील कलावंत ज्योत्स्ना भोळे. ज्योत्स्ना भोळे यांना अभिनया प्रमाणे आवाजाची […]

हम आपके है कौन

‘हम आपके है कौन’ हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९४ रोजी रिलीझ झाला. काही काही चित्रपट काळ कितीही पुढे सरकला तरी ते ‘कालचे ‘ होत नाहीत. ते कायमच ‘आजचे ‘ राहतात. राजश्री प्रॉडक्शनच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन ‘ या कौटुंबिक चित्रपटाबाबत अगदी तसेच झाले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास आज यशस्वी २७ वर्षे पूर्ण होत […]

समालोचक अनंत सेटलवाड

अनंत सेटलवाड यांचे समालोचन एखाद्या शैलीदार फलंदाजाच्या फलंदाजीसारखे असे. त्यांचा जन्म १९३५ रोजी झाला. इंग्रज भारतातून निघून गेल्यानंतरही क्रिकेट या देशात राहिले आणि रुजले. साठ, सत्तर आणि ऐंशीच्या दशकात एकीकडे भारतीय क्रिकेट संघाची वाटचाल धिम्या गतीने होत असताना, रेडिओच्या माध्यमातून हा खेळ घराघरांत पोहोचवण्याचे श्रेय भारतातील जाणकार आणि रसिक समालोचकांनाही दिले पाहिजे. भारतीय चित्रपट संगीताचा होता […]

मराठीतले लोकप्रिय बालकथाकार राजीव तांबे

राजीव तांबे गेली अनेक वर्षे मुलांसाठी काम करत आहेत. मराठीतले लोकप्रिय बालकथाकार राजीव तांबे यांचा जन्म ४ ऑगस्ट रोजी झाला. त्यांच्यासाठी विविध पुस्तके, हसत-खेळत शिक्षणाच्या पद्धतींचा विकास केला आहे. युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे. त्या माध्यमातून विविध स्तरातील विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेत त्यांनी […]

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव) येथे झाला. ‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार व पारतंत्र्यात प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते नाना पाटील हे ‘येडे मच्छिंद्र’ येथेच व्हर्नाक्युलर फायनल ही […]

मराठीतील लेखिका, समीक्षिका सरोजिनी वैद्य

मराठीतील लेखिका, समीक्षिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म १५ जून १९३३ रोजी अकलूज येथे झाला. ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुखपदी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी त्यांनी काम केले. जेष्ठ कवी शंकर वैद्य हे त्यांचे पती होत. डॉ. सरोजिनी वैद्य यांनी या लंडनच्या आजीबाईंची गोष्ट ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ या पुस्तकातून […]

आयुष्यावर बोलू काही “ची … अठरा वर्ष..

३ ऑगस्ट २००३ ला सहज म्हणून सादर केलेला एक कार्यक्रम , संदीपच्या कविता आणि गाणी आणि मी आणि संदीपने केलेली गाणी , असा एक प्रयोग करून तर बघूया इतक्या सहज सुचलेली ही कल्पना . एक प्रयोग झाला. हाउसफुल्ल !! उत्तम दाद मिळाली . आम्हालाही मजा आली . बास्स्स … आनंदाने आपापल्या घरी गेलो … !! लगेच […]

पुण्याच्या महाराष्ट्रकलोपासक संस्थेचा स्थापना दिवस

पुण्याच्या महाराष्ट्रकलोपासक संस्थेची स्थापना ३ ऑगस्ट १९३६ रोजी झाली.. सध्या पुण्यातील पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करणारी संस्था ही या संस्थेची प्रमुख ओळख आहे. नटवर्य केशवराव दाते यांच्या ‘महाराष्ट्र’ नाटक मंडळी पासून प्रेरणा घेऊन हौशी कलाकारांसाठी सुरू झालेली संस्था म्हणजे ‘महाराष्ट्र कलोपासक, पुणे!’ ‘महाराष्ट्रीय कलोपासक पुणे’ ही संस्था नूतन मराठी विद्यालय या शाळेच्या शिक्षकांनी एकत्र येऊन सुरू […]

1 186 187 188 189 190 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..