नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

अर्नेस्ट हेमिंग्वे

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू होते. या यादवीत एका अमेरिकन क्रांतिकारकाला हौतात्म्य आले. त्यावर ‘फॉर हूम द बेल टोल्स’ ही कादंबरी लिहिली. लेखनाबरोबर बैलांच्या झुंजी, शिकार, प्रवास हे त्यांचे आवडते छंद. यासाठी वेळ काढून ते टांगानिकाला गेले. तेथील खेळांवर ‘डेथ इन द आफ्टरनून’, प्रवासवर्णनांवर ‘ग्रीन हिल्स ऑफ आफ्रिका’ हे ग्रंथ लिहिले. […]

गायिका गंगूबाई हनगळ

१९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी “गांधारी हनगल’ या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली. मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. […]

डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे

भारतीय एकात्मतेची पुष्टी करणारी विधायक अध्ययनदृष्टी, आंतरशाखीय अभ्यासपद्धती ही ढेरे यांच्या विचाराची, लेखनाची वैशिष्ट्ये होती. एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे त्यांनी सारे आयुष्य संशोधन, लेखन यांसाठी दिले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. […]

आषाढी एकादशी

आषाढ महिना म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती विठ्ठल रखुमाईची मुर्ती आणि पंढरपूरची वारी. तसंच विठ्ठल म्हटल्यावर कळत न कळत आपण गुणगुणू लागतो ती विठ्ठलाची गाणी. […]

सर एडमंड हिलरी

हिमालयातील या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणजे आकाशदेवता म्हटले जाते; तर तिबेटीमध्ये या शिखराला चोमुलुंग्मा म्हणजे विश्वदेवता म्हटले जाते. हिमालयाची भव्यता, तेथील गूढगंभीर आणि अंतर्मुख करणारे वातावरण, निसर्गाची हरक्षणाला पालटणारी रूपे आणि नजर बांधून ठेवणारे दिव्य सौंदर्य लक्षात घेतले तर ही नावे किती अर्थपूर्ण आहेत, हे ध्यानात येते. अशा या शिखरावर पाऊल ठेवावे ही तमाम गिर्यारोहकांची आकांक्षा असते. त्याची पूर्ती होणे अवघड आहे, हे माहीत असूनही असे स्वप्न पाहणारे अनेक असतात. […]

बँक ऑफ बडोदा

बँकेचे पहिली शाखा मांडवी (बडोदा) मध्ये उघडली गेली. दोनच वर्षात बँकेने दुसरी शाखा अहमदाबाद इथे काढली गेली. त्यानंतर मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली इथे बँकेने शाखा काढल्या. बँक खऱ्या अर्थानी वाढली ती दुसऱ्या महायुद्धानंतर. […]

जागतिक बुद्धिबळ दिवस

साहित्यामध्ये बुद्धिबळाचा पहिला संदर्भ इ.स. पूर्व ५००मध्ये भारतात दिघ निकय मध्ये ब्रह्मजल सुत्त या ग्रंथात आढळतो. पर्शियामधील पहिला संदर्भ इ.स. ६०० च्या दरम्यान आढळतो, येथे त्याला शतरंज असे म्हटले आहे. सातव्या शतकात मोहर्‍यांचे वर्णन केलेले आढळते. इ.स. ८०० पर्यंत खेळ चीनमध्ये शिआंकी नावाने पोहोचला होता. इ.स. १००० पर्यंत हा खेळ सर्व युरोपभर पसरला. पहिली आधुनीक बुद्धिबळ स्पर्धा लंडनमध्ये १८५१ ला घेण्यात आली. […]

अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग

मानवजातीच्या आयुष्यातील हा एक ऐतिहासिक क्षण होता. हा प्रसंग जेव्हा टेलिव्हिजनवर दाखविण्यात आला, तेव्हा जगातील १/५ लोकांनी तो बघितला. अपोलो-११ या यानाने १६ जुलै १९६९ रोजी सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली. […]

गुग्लिएल्मो मार्कोनी

अनेक शास्त्रज्ञांनी हॅन्रिच हर्ट्झच्या बिनतारी संदेशांच्या प्रयोगांमधून हवेतून जात असलेल्या अदृश्य लहरींचे अस्तित्व स्वत:ही तसेच प्रयोग करून तपासले होते. त्यामुळे अशा लहरी आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या प्रत्यक्षात असतात या विषयी कुणाच्याच मनात शंका नसायच्या. तसेच मॅक्सवेलनेही इलेक्ट्रोमॅग्नेटीक लहरींच्या संदर्भात मांडलेली समीकरणेसुद्धा पडताळून पाहतात येतात, हेही अनेक जणांना पटले होते. पण या सगळ्याचा उपयोग प्रत्यक्षात कुठे आणि कसा करता येईल हे मात्र कुणालाच उमगत नव्हते. […]

ब्रूसली

ब्रूसलीच्या वडिलांनी ब्रूसलीच्या वयाच्या १८ वर्षी हाँगकाँग सोडण्याचा निर्णय घेतला. नाइलाजाने घेतलेला हा निर्णय मात्र ब्रूस लीचं आयुष्यच बदलवणारा ठरला. युनिव्हसिर्टी ऑफ वॉशिंग्टनमध्ये ड्रामा विषयात डिग्रीचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली. शिक्षणाची गाडी सुरू असतानाच त्याच्यातलं मार्शल आर्ट्स मात्र त्याला स्वस्थ बसू देईना. अमेरिकेतच त्याने मार्शल आर्ट्स शिकवायला सुरूवात केली, तेव्हा त्याचं वय होतं १८. […]

1 192 193 194 195 196 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..